वाचन संस्कृती एक शाश्वत आनंद

Cityline Media
0
वाचन संस्कृती म्हणजे ज्ञानाचा वारसा पुढे नेणारी,विचारांना प्रगल्भ करणारी आणि व्यक्तिमत्त्व समृद्ध करणारी सवय होय. "वाचाल तर वाचाल" हा मंत्र मानवी विकासाचा पाया आहे,जो पुस्तकांच्या माध्यमातून अनुभवविश्व विस्तारतो. सध्याच्या डिजिटल युगात ही संस्कृती टिकवण्यासाठी विवेकी ,चिकित्सक वैचारिक पुस्तके वाचनाची जोड देणे तितकेच गरजेचे आहे वाचन हि सन्मानजनक कृती आहे जी माणसाला व्यवस्थेच्या विरोधात बंड करायला शिकवते,विचारांची हत्या करण्याच्या प्रयत्नात अनेक राजेशाह्या नाश पावतात.
वाचन संस्कृती:एक शाश्वत आनंद देणारी सकारात्मक कृती आहे.आज जागतिक पुस्तक वाचन दिन २३ एप्रिल जागतिक पुस्तक दिनानिमित्त पुस्तकाविषयी व्यक्त होताना सांगावेसे वाटते की वाचन संस्कृती ही काळाची गरज आहे. "वाचाल तर वाचाल" हा मंत्र केवळ परीक्षेपुरता मर्यादित न ठेवता,तो जीवनाचा भाग व्हायला हवा.

मानवी जीवनात पुस्तकांचे स्थान हे अत्यंत मोलाचे आहे,कारण पुस्तके आपल्याला केवळ माहिती देत नाहीत तर ती आपल्याला जगाकडे पाहण्याची एक नवी आणि सकारात्मक दृष्टी देतात. आजच्या धावपळीच्या युगात आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावात वाचन संस्कृती कुठेतरी मागे पडत चालली आहे की काय,अशी शंका वारंवार उपस्थित केली जाते.

मात्र,हे लक्षात घेणे गरजेचे आहे की मोबाईल किंवा संगणकाच्या पडद्यावर मिळणारी माहिती ही तात्कालिक असू शकते,परंतु पुस्तकांचे सलग वाचन हे आपल्या विचारांना प्रगल्भ बनवण्याचे काम करते.
एखादे उत्तम पुस्तक वाचणे म्हणजे त्या लेखकाच्या आयुष्यातील अनेक वर्षांचा अनुभव काही तासांत स्वतःच्या पदरात पाडून घेण्यासारखे आहे.

पुस्तके ही आपली सर्वात चांगली मित्र असतात,जी आपल्याला कधीही एकटे पडू देत नाहीत. एकाकीपणाच्या क्षणी किंवा जीवनातील कठीण प्रसंगात एखादे प्रेरणादायी पुस्तक आपल्याला सावरण्याचे आणि नवी उमेद देण्याचे कार्य करते.थोर समाजसुधारक आणि महापुरुषांच्या आयुष्यात वाचनाचे किती महत्त्व होते, हे आपण त्यांच्या चरित्रातून आणि समाजात झालेल्या कृतिशील बदलामुळे पाहतोच.

वाचनामुळे आपली शब्दसंपदा वाढते, बोलण्यात भक्कम आत्मविश्वास येतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली कल्पनाशक्ती विस्तारते.कल्पनाशक्तीचा हा प्रवास आपल्याला अशा जगाची सफर घडवून आणतो, जिथे आपण कधीही प्रत्यक्षात पोहोचू शकत नाही.

जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी वाचनाची ही परंपरा अधिक जोमाने पुढे नेणे आवश्यक आहे. विशेषतःतरुण पिढीने मोबाईलच्या आभासी जगातून बाहेर पडून अधून मधून एखादे तरी पुस्तक हातात धरून त्याचा सुगंध आणि त्यातील शब्दांचा गोडवा निश्चितच अनुभवायला हवा.

दररोजच्या व्यग्र दिन चर्येतून किमान पंधरा ते वीस मिनिटे जरी आपण शांतपणे वाचनासाठी दिली,तरी आपल्या व्यक्तिमत्त्वात आमूलाग्र बदल होऊ शकतो.समृद्ध विचारांचा वारसा आणि प्रगल्भ संस्कृती घडवण्यासाठी पुस्तकांशिवाय दुसरा कोणताही उत्तम पर्याय नाही. त्यामुळेच पुस्तकांशी मैत्री करूया आणि आपल्या ज्ञानाची कवाडे सदैव उघडी ठेवूया,हीच खऱ्या अर्थाने या दिनाची सार्थकता ठरेल.

वाचक वर्ग हा कल्पनेतला ही वास्तवाला हा कितीही मोठा प्रश्न असतो तरीही पुस्तकांच्या या वास्तवादी आणि अनुभव पूर्ण जगातला अनुभव कुठेच येणार नाही मोबाईल मध्ये सतत स्क्रोल करून मुलांची बौद्धिक पातळी ही कुठेतरी कमी पडत चाललेली आहे परंतु ज्या वेळेस मुले पुस्तक हातात घेऊन समाविष्ट असणाऱ्या शब्दांचा अर्थ स्वतःसमजून घेतात त्यावेळेस वाचलेल्या प्रत्येक शब्दांचा त्यांना अर्थ हा आपोआप तुमचं जातो मुलांना पुस्तके वाचा असे म्हणण्यापेक्षा पालकांनी स्वतःपासून जर सुरुवात केली.

मुलांना आणखीन वाचनाबद्दल गोडी निर्माण होऊ शकते पुस्तकांचे महत्त्व हे फार आधीपासून सांगण्यात आलेले आहे पुस्तकांमधून ज्ञानासोबतच चांगल्या वाईट गोष्टींचा उलगडा होतो शिवाय अनेक अनुभवांची शिदोरी ही आपल्याला पुस्तकातूनच मिळते. कितीही मोबाईलचे युग असले तरीही वाचनाची आवड असणारे अजूनही आपल्याला पाहायला मिळतात.

पु.ल.देशपांडे यांच्या 'बटाट्याची चाळ 'या पुस्तकातून हे विश्वची माझे घर या वाक्याचे अनुभूती येते भिन्न प्रकारच्या व्यक्ती आणि त्यांचे स्वभाव कितीही वेगवेगळे असले तरी एकाच ठिकाणी अतिशय गजबजलेल्या वस्तीत चाळीमध्ये  वास्तव्यास असणाऱ्या गुण्यागोविंदाने कसे राहायचे याचे अतिशय अनुभव पूर्ण आणि वास्तववादी शब्दांमध्ये त्यांनी वर्णन केलेले दिसून येते.

पुस्तके ही बरेच काही सांगून जातात आणि शिकूनही जातात श्यामची आई या पुस्तकातूनही आई ने आपल्या मुलांवर संस्कार घडवताना ते कसे घडवायचे हे पुस्तकातून सांगितले आहे. मुलांच्या प्रत्येक गोष्टीला होकार न देता नकारही त्यांना प्रेमाने देता आला पाहिजे.

मुलांवर संस्कार करणे ही प्रत्येक आईची परीक्षाच असते या परीक्षेचा अभ्यास पुस्तकातून व्हायला हवा अर्थात प्रत्येक आईला ही जमेलच असे नाही परंतु वेळ मिळेल तर अभिजात साहित्यात विद्रोही लिखाणाने समाजातील शोषित वंचित आणि दुर्लक्षित घटकांचे जगा समोर आणले. तेव्हा किमान पंधरा मिनिटे तरी पुस्तकांचे वाचन हे केलेच पाहिजे मराठीची काय बोलू कौतुके,अमृता परी पैसा जिंके ,आपल्या माय मराठी असेच कौतुक किती आहेत हे केवळ पुस्तकांमधूनच कळेल त्यामुळे पुस्तके वाचली पाहिजे.
रुपाली निलेश भालेराव
लोणी ता.राहाता

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!