तु संध्याकाळी येथेच भेट असे म्हणत सिडकोत महिलेचा विनयभंग

Cityline Media
0


नाशिक दिनकर गायकवाड महिलेचा हात पकडून तिचा विनयभंग करणाऱ्या ४० वर्षीय इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घडलेल्या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला ही दि. १३ एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास सिडकोतील औदुंबर स्टॉपजवळून जात होती. त्यावेळी आरोपी मोहसीन जैनुद्दीन अत्तार (वय ४०, रा. महाराणाप्रताप चौक, सिडको) याने तिचा हात पकडून स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला, तसेच अश्लील इशारा करून "तू मला सायंकाळी याच ठिकाणी भेट," असे म्हणून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मोहसीन अत्तार याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!