संगमनेर प्नतिनिधी तालुक्यातील कोंची गावातील जयभीम संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५ व्या जयंतीचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते.
प्रसंगी गौतम भालेराव यांनी प्रबोधनपर भीमागिते सादर करून ग्रामस्थांची मने जिंकली. महापुरुषांचे अभ्यासक संजय जोंधळे यांनी डॉ. बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित व्याख्यानातून त्यांच्या अनेक प्रसंगांची माहिती सांगितली,सकाळी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस गावातील प्रतिष्ठीत मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून जयंतीस प्रारंभ झाला.
दुपारनंतर भीम अनुया्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढून जल्लोष केला.या भव्य दिव्य मिरवणुकीत ग्रामस्थांनी लक्षणीय सहभाग नोंदविला
हा एक दिवसीय कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जयभीम संघटनेच्या सभासद व पदाधिकाऱ्यांसह भोसले परिवारातील अबाल वृद्धांनी परिश्रम घेतले.मा.सैनिक किशोर भोसले यांच्या तर्फे दिलेल्या प्रीती भोजनाने जयंती उत्सवाची सांगता झाली.
