चंद्रपूर येथे भागवदाचार्य सिमा काळे यांच्या सुश्राव्य किर्तनाने भाविक मंत्रमुग्ध

Cityline Media
0
सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सिमा काळे गौरव

लोणी रुपाली भालेराव राहता तालुक्यातील चंद्रपूर येथे नुकतेच सायंकाळी ७ ते ९ या वेळेत ह.भ.प. भागवदाचार्य सौ. सिमाताई काळे चांदवडकर यांच्या हरिभक्तीपरायण कीर्तनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.
हनुमान मंदिर परिसर या सोहळ्यासाठी भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. हजारो भाविकांनी या सुश्राव्य कीर्तनाचा लाभ घेत हरिनामाचा जयघोष केला.या विशेष प्रसंगी भागवताचार्य सौ.सिमा काळे यांचा भव्य सत्कार करण्यात आला असून,त्यांना विठ्ठल-रुक्मिणीची सुंदर प्रतिकृती भेट म्हणून प्रदान करण्यात आली.

या मंगलमयी सोहळ्याला परिसरातील अनेक मान्यवर आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी आपली उपस्थिती दर्शवली. यामध्ये पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना प्रवरानगरचे संचालक  गोरक्षनाथ. तांबे, ह.भ.प.मायराज महाराज अनर्थे चंद्रपूरकर, ट्रक सोसायटी प्रवरानगरचे मा.संचालक नारायण  कहार पांडुरंग बाबूराव बनसोडे, अशोक दहिवळकर, प्रकाश खंडागळे आणि शेलार यांचा समावेश होता.

मान्यवरांच्या हस्ते ताईंचा सन्मान करताना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.कार्यक्रमाला धार्मिक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींनीही हजेरी लावली होती. यामध्ये अशोक महाराज गोत्राळ,अंबादास महाराज पवार, दत्तात्रय महाराज तांबे, मुकेश महाराज तांबे, यज्ञश्री कडलग आणि शंकर महाराज शेंडे यांचा समावेश होता.

तसेच डॉ. नबाजी रोकडे, नारायण रोकडे आणि मृदुगाचार्य निशांत महाराज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.संपूर्ण कीर्तन सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. सौ.सिमा च्या ओघवत्या शैलीतील किर्तनाने उपस्थित भाविकांच्या मनाचा ठाव घेतला. चंद्रपूर आणि परिसरातील हजारो भाविक या भक्ती सोहळ्याचे साक्षीदार झाले असून,या कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!