घराचा उघडा दरवाजा दिसताच ८७ हजाराचा ऐवज लंपास

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून लॅपटॉपसह ८७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली.
फिर्यादी दुर्गेश गोरख सोनार (रा. रासबिहारी लिंक रोड) हा विद्यार्थी असून, तो दि.३ एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास होस्टेलमध्ये झोपलेला होता. त्यावेळी रूमचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून अनोळखी इसमाने घरात प्रवेश करून ७६ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप, ४९९ रुपये किमतीचा माऊस, १७०० रुपये किमतीचा आणखी एक माऊस, ९०० रुपये किमतीचे तीन पेनड्राईव्ह व ७०० रुपये किमतीची चांदीची चेन असा ८६ हजार ९९ रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!