रिपाइं नेते प्रकाश लोंढेवर पोलिसांकडून अन्याय-सामाजिक न्यायमंत्री ना.आठवले

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड रिपाइंचे नेते प्रकाश लोंढे यांच्याविरोधात पोलिसांनी कारवाई केली असून त्यांची कोठडीत रवानगी झाली आहे.या विषयी केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले, लोंढे याठिकाणी नाही, याची खंत आहे.त्यांच्यावर पोलिसांनी अन्याय केला आहे. लोंढेंना वाचविण्यासाठी प्रयत्न केले, पण ते अपूर्ण पडल्याचे नामदार आठवले यांनी नाशिक येथे आले असता स्पष्ट केले.
प्रसंगी पत्रकार परिषदेत बोलताना नामदार आठवले बोलताना पुढे म्हणाले की महिलांना राजकीय प्रतिनिधित्व देण्यासाठी महत्त्वाचे मानले गेलेले महिला आरक्षण विधेयक विरोधकांच्या भूमिकेमुळे मार्गी लागू शकले नाही, असा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला.

या मुद्द्यावरून रिपब्लिकन पक्ष देशभर आंदोलन उभारणार असल्याची घोषणा त्यांनी केली.पत्रकार परिषदेत बोलताना आठवले यांनी विधेयकाच्या तरतुदींवर प्रकाश टाकला.यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विरोधकांवर टीका केली.

लोकसभेतील जागांची संख्या वाढवून त्यामध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव होता. यासाठी मतदारसंघांची पुनर्रचना (डिलिमिटेशन) आवश्यक होती. मात्र, दक्षिण भारतातील राज्यांचे प्रतिनिधित्व कमी होईल,असा गैरसमज पसरवून काँग्रेससह काही पक्षांनी या विधेयकाला विरोध केला.

आणि त्यामुळे ते अयशस्वी ठरले, असा दावा त्यांनी केला. दरम्यान, महिला आरक्षणाची अंमलबजावणी करताना ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. ओबीसी घटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळाल्याशिवाय महिला आरक्षण प्रभावीपणे राबवता येणार नाही, असे ते म्हणाले.

धर्माच्या आधारावर आरक्षण देणे घटनाविरोधी असल्याचे सांगत त्यांनी मुस्लीम आरक्षणाच्या मागणीवरही आक्षेप नोंदवला. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर अनेक मुस्लीम 'जाती आधीच ओबीसी प्रवर्गात समाविष्ट असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!