फत्याबाद राहुल ओहोळ श्रीरामपूर तालुक्यातील फत्याबाद येथील युवा मित्र मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक होऊन मिरवणूकीचे रूपांतर अभिवादन सभेत झाले यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
गावचे सरपंच पांडुरंग आठरे यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांना भीम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी रामदास ओहोळ,रमेश ओहोळ,संतोष ओहोळ,रवींद्र ओहोळ,राहुल ओहोळ सुधीर ओहोळ,
श्रीधर ओहोळ,प्रवीण ओहोळ,अमोल ओहोळ,कुणाल ओहोळ,साई ओहोळ अशोक ओहोळ,गणेश आठरे, राहुल आठरे जमीर पटेल शाकीर पटेल, शौकत पटेल,विलास धाकतोडे आदींसह विविध क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते.
