श्रीरामपूर प्नतनिधी-शहरातील बहुजन शिक्षण संघ संचलित शंभुक विद्यार्थी वसतिगृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.वसतिगृह ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारका पर्यंत शिवाजीरोड, संगमनेररोड मार्गे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची ढोल ताशाच्या गजरात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणूक डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारका जवळ येताच विविध सामाजिक संघटनांनी व फुले शाहु आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले व वसतिगृहाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
लुम्बीनी बुध्द विहारात विद्यार्थी अनुक्रमे संग्राम तुजारे, गौरव कहाते,अजित जाधव,यश त्रिभुवन,अमोल घुले,कार्तिक चव्हाण,सोहम मगरेसाई गायकवाड, नरेंद्र जाधव,यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर गीतं सादर केली.
याप्रसंगी बहुजन वंचितंचे संतोष त्रिभुवन, विद्रोहीचे ॲड.अमोल सोनवणे,
मिशन वात्सल्य शासकीय समितीचे मिलिंदकुमार साळवे,नामदेव शिंपी समाजाचे कैलास खंदारे, सामाजिक कार्यकर्ते साजीद शेख, सिध्दार्थ युथ फाउंडेशनचे अमोल मिसाळ,सक्षम फाउंडेशनचे सुशील पठारे, संदिपान वाव्हळ,मा.पोलिस अधिकारी शिवाजी पवार, प्रा.डॉ.शिवाजी पंडित,सरिता सावंत,कविता दिवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सिध्दार्थ दिवे,सचिन बर्डे,अजय बर्डे,सुरज सदाफळ यांनी प्रयत्न केले.आभार प्रदर्शन अशोकराव दिवे यांनी केले.
