राहुरी कमलेश विधाटे राहुरी तालुक्यातील म्हैसगाव व दरडगांव थडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.श्री केदारेश्वर माध्यमिक विद्यालय, म्हैसगाव येथे हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्जेराव मुसळे, शिक्षक श्री.कणसे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विलास गागरे, चागदेव चोपडे,नानासाहेब विधाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून डॉ. आंबेडकर यांनी देशातील नागरिकांसाठी केलेले अमूल्य कार्य तसेच भारताला दिलेल्या राज्यघटनेचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षण,समानता आणि न्याय यांचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.
कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ओळख करून देण्यात आली तसेच त्यांच्या देशासाठीच्या योगदानाची जाणीव करून देण्यात आली. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात झाला.म्हैसगाव ग्रामपंचायत व भिम क्रांती मित्र मंडळ या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली व शिव स्वराज्य महाराज यांना ही भिम क्रांती मित्र मंडळ यांना पुष्पहार करण्यात आले.
यावेळी म्हैसगांव चे महिला सरपंच सौ.सुजाता आरुण पवार ,उप सरपंच शिवाजी बर्डे ,सदस्य भिमा दुधाट,आमोल यादव ,राष्ट्रवादी काँग्रेस उपजिल्हाध्यक्ष विलास गागरे , कृषी मार्केट कमिटीचे बापुसाहेब गागरे ,रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष राजू आढाव ,रिपब्लिकन सेनेचे युवा कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव ,नंदू साळवे ,ॲड संजय विधाटे ,बबन विधाटे , विकास छत्रे,अशोक गागरे , बुद्धाचार्य मोहनदास विधाटे ,नानासाहेब हांडे ,पोपट हुलुळे , लिंबाजी मुसळे मोठ्या संख्येने शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.
