राहुरी शिवाजी तांबे राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील तांबे वस्तीवर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या वेळी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी पौर्णिमेचे चांदणे पडावे" या प्रमाणे परिसरात विद्युत रोषणाईचा झगमगाट केला होता.येथील संघर्ष मित्र मंडळ,तरुणांनी आणि नागरिकांनी जयंती उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या प्रसंगी रिपब्लिकन सेनेचे अहिल्यानगर जिल्हा प्रमुख राजू आढाव, यांनी नागरिकांना बोधीसत्व,परमपूज्य,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या जीवनाबद्दल संबोधित केले. यावेळी भीमसैनिकांनी दिलेल्या "जय भीम" च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.प्रशस्त असा मोठा डीजे लावून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या गाण्यावर उपस्थित आबालावृद्ध बेभान होऊन नाचले.
येथे येणाऱ्या भीमसैनिकांसाठी अन्नदान कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते.या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके,बाबा साठे,भीम आर्मीचे श्याम जाधव, कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊसाहेब नाना तांबे,राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार श्री. भांड,श्री.बागुल,आदी उपस्थित होते.कार्यक्रमाची प्रस्तावना अशोक बाबुराव तांबे, यांनी केली.
