ठरलेल्या वेळेतच लग्न विधी करण्याचे आवाहन
संभाजीनगर प्नतिनिधी कन्नड तालुक्यातील पिशोरपासुन २० किमी अंतरावरील शेलगाव जवळील अजिंठा लाॅन्स येथे अहिल्यानगरच्या कोंचीच्या नालंदा बौद्ध आश्रमाचे भंते करूणानंद महाबोधी थेरो हे मंगल परिणय विधी सोहळा कार्यक्रमास दाखल झाले.मात्र वधू वरामुळे लग्नास उशीर झाल्याचे कारण दाखवून भंन्ते आणि त्यांचा भिखू संघ मागे फिरल्याने काहीसा गोंधळ उडाला.
दोन वाजेचा चार वाजता सुरू करण्याची वेळ आली अखेर पाच वाजता स्वतःभंते नवरदेवास गेटवर घेऊन आले,तरी देखील नवरदेव पुन्हा डिजेसमोर नाचायला गेला व नवरी तर पाच वाजेपर्यंत मेकअप करून आलीच नव्हती.
पाच वाजता भंतेनी तीन वेळेस सुचना दिली व दहा मिनिटांची वेळ नाईलाजास्तव वाढवुन दिली,तरी देखील नवरी नवरदेव आले नाही,शेवटी भंते व बाल श्रामनेर गाडीत बसुन निघाले तेव्हा कुठे नवरी नवरदेव गेटवर आणण्यात आले,व भंते ना उशिर होतच असतो असे सागु लागले.
पुन्हा भंते गाडीतुन उतरले व स्टेजवर जाणार तितक्यात एक अती शहाणा भंते जवळ आला आणि म्हणाला भंते उशीर झाला आता लवकर उरकुन घ्या,फक्त पंचशील घ्या,व साधुकार द्या, अशाप्रकारे भंतेना उलट उत्तरे देऊ लागला.
याबाबत बोलताना भंन्ते करुणानंद महोबोधी थेरो म्हणाले की उशिर त्यांनी करायचा आणि भंतेना शॉर्टकट मार्ग सुचवायचा हे चुकीचे आहे असे भंन्ते म्हणाले अखेर भंते करूणाबोधी थेरो व भिख्खु श्रामनेर संघ गाडीत बसून विधी न लावता अहिल्यानगरला निघुन आले.
वेळेवर लग्न न लागल्याने इत्तर लोक पाहुणे मंडळी नाराज होतात नाव ठेवतात,लोकांना लांबचा प्रवास असतो,हे आयोजकांनी समजुन घेतले पाहीजेत,वेळेवर मंगल परिणय विधी लावले पाहीजेत,जलदान अथवा पुण्यानुमोदन.प्रथम स्मृतीदिन सुध्दा बौध्द समाजाचे लोक वेळेवर करत नाही.
यानंतर पत्रिकेतील वेळा पेक्षा एक तासानंतर मंगल परिणय विवाह लागल्यास नालंदा धम्मभुमी कोंची मांची भिख्खू संघ विधी न लावता निघुन जाईल,वेळेवर कार्यक्रम घेत असाल तर भंते ना बोलवा अन्यथा बोलवु नका हे सर्वांनी लक्षात घ्यावेअसे भंते करूणाबोधी थेरो यांनी स्पष्ट केले.
