श्रीरामपूरचे नमो उद्यान जिल्ह्यात मॉडेल ठरणार : आमदार हेमंत ओगले
श्रीरामपूर दिपक कदम-विकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत मंजूर असलेल्या १ कोटी रुपयांच्या नमो उद्यानाचा शुभारंभ आमदार हेमंत ओगले यांच्या हस्ते तर मा. आमदार भानुदास मुरकुटे आणि मा. आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली.
यावेळी भानुदास मुरकुटे म्हणाले की, शहर विकासासाठी आपण सर्वतोपरी मदत करु आणि अधिकचा निधी मिळवण्यासाठी आ. ओगले आणि मा आ. भाऊसाहेब कांबळे यांना सोबत घेऊन शासनाकडे प्रयत्न करु.
नगराध्यक्ष करण ससाणे आणि त्यांचे सर्वच सहकारी चांगले काम करत असल्याचे मा.आ. मुरकुटे म्हणाले.
यावेळी आमदार ओगले म्हणाले,श्रीरामपूर नगरपरिषदेचे नमो उद्यान हे नक्कीच जिल्ह्यात मॉडेल ठरेल.
निवडणुकीनंतर प्रत्येकाने पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राजकारण बाजूला ठेऊन शहर विकासासाठी एकत्र आले पाहिजे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे याची करण ससाणे यांनी नगराध्यक्ष म्हणून भेट घेतली. यामध्ये काय वावगे आहे. पालकमंत्री विखे यांनी कुठलाही दुजाभाव न करता श्रीरामपूरसाठी भरघोस निधी दिला असल्याचे आमदार ओगले यांनी जाहीरपणे यावेळी सांगितले. मा.आ. भाऊसाहेब कांबळे म्हणाले, मा. आ.स्व.जयंत ससाणे यांच्या कार्यशैली प्रमाणेच नगराध्यक्ष करण ससाणे काम करत आहे. आपण देखील विकास कामासाठी सोबत असल्याचे त्यांनी सांगितले.
नगराध्यक्ष करण ससाणे म्हणाले, श्रीरामपूरचे नमो उद्यान हे लवकच नागरिकांच्या सेवेत येईल. जिल्ह्यात नमो उद्यानाचा शुभारंभ करणारी नगरपालिका ही श्रीरामपूर पहिलीच नगरपालिका असल्याचे ससाणे यांनी सांगितले.
यावेळी कृषी उत्पन्न समितीचे सभापती बाजार सुधीर नवले, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे,तालुकाध्यक्ष प्रमोद भोसले,शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर उपनगराध्यक्ष कांचन सानप, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, गटनेते मुजफ्फर शेख, ज्येष्ठ नगरसेवक दिलीप नागरे,
सभापती मंजुश्री मुरकुटे, रईस जहागिरदार, योगेश जाधव, दिपक वमने, नगरसेविका निलोफर शेख, जायदाबी कुरेशी, वैशाली पोटे, सोनिया कक्कड, नवनीतकौर सेठी, आशा परदेशी, नगरसेवक संतोष कांबळे, डॉ. दिलीप शिरसाठ, गोपाल लिंगायत, दिलीप सानप, निलेश नागले, फिरोज शाह, कलीम कुरेशी, रितेश एडके, लकी सेठी, बिट्टू कक्कड, मर्चेंटचे अध्यक्ष राहुल कोठारी, रूपाली भागवत, रवी खिलारी, सुधीर वायखिंडे, सागर कुहऱ्हाडे, अभिजित लिप्टे, रमेश कोठारी, श्री. शिंपी, अशोक बागुल यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
