नाशिक दिनकर गायकवाड अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात नाशिक येथील संघर्ष समितीच्या वतीने नुकतेच पोलिस आयुक्ताकडे निवेदन देण्यात आले.
अनुसूचित जाती (एस.सी) आरक्षणात उपवर्गीकरण करण्याच्या मुद्द्यावर तीव्र विरोध व्यक्त करत एस.सी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती,नाशिक जिल्हा यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात व सरकरवाडा पोलिस ठाण्यात निवेदन दाखल केले आहे. यावेळी उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांची भेट समितीचे पदाधिकारी आणिसमितीचे अध्यक्ष प्रकाश पगारे यांची उपस्थिती होती.
समितीचे अध्यक्ष प्रकाश पगारे यांच्या नेतृत्वाखाली सादर केलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेमुळे अनुसूचित जातीतील एकता भंग होईल आणि संपूर्ण समाजाच्या हक्कांवर गदा येईल.समितीने निदर्शनास आणले की,या प्रक्रियेचा निषेध करण्यासाठी विविध कार्यक्रम आणि आंदोलने सुरू असतील.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकतेच्या तत्त्वज्ञानाचा आदर राखत आरक्षणाची एकात्मता कायम ठेवण्याची मागणी केली उपवर्गीकरण प्रक्रियेला कायद्याच्या चौकटीत राहून विरोध करण्यात येत आहे .
नाशिक जिल्ह्यातील अनुसूचित जाती समाजाच्या विविध संघटनांचा या समितीला पाठिंबा आहे.
समितीने पोलिसांकडे सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याची विनंती केली आहे, जेणेकरून शांततेत आंदोलन करता येईल.यावेळी प्रकाश पगारे,मा. न्यायधीश अनिल वैद्य डॉ प्रवीण गांगुर्डे ,अनिल गांगुर्डे,अरुण दोंदे, किशोर गांगुर्डे ,कैलास तेलोरे, एकनाथ मोरे,सनी रोकडे,लक्ष्मी ताठे,कांचन जाधव मिलिंद हाटे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
