संगमनेर प्नतिनिधी तालुक्यातील निळवंडे येथील भाऊसाहेब संतुजी थोरात विद्यालय निळवंडे येथील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे या परिसरातून अभिनंदन होत आहे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे देखील विशेष कौतुक होत असल्याची माहिती प्राचार्य श्रीकांत माघाडे यांनी माध्यमांना दिली.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे पालक,शिक्षक,संस्था व निळवंडे गावामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.विद्यालयात प्रथम क्रमांक साईराज शशिकांत पवार याने मिळवला असून त्याला ७६.६० शेकडा गुण मिळवले आहेत. तर अमित प्रभाकर पवार व प्रणाली नितेश गायकवाड यांना ७६.२० शेकडा गुण मिळवून दुसरा क्रमांक मिळवला.
तिसरा क्रमांक आदिती गोरक्षनाथ केरे हिने पटकावला असुन तिला ७५.८० गुण मिळाले आहे अभिमन्यू संदीप गाढे याने ७४.४९ गुण घेऊन चौथा क्रमांक मिळवला.
आदित्य बाळासाहेब पवार याने ६९.८० गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळवला.
याबद्दल सर्व गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचे सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुधीर तांबे, संचालक बाबा खरात, स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष सुभाष माधव पवार, सचिव माधव शिवराम पवार, संचालक नाना बाळकृष्ण पवार, रायभान नारायण पवार, प्रकाश पंढरीनाथ पवार, आप्पासाहेब दामू पवार, उत्तम गणपत पवार, बाळासाहेब जगन्नाथ आहेर, मच्छिंद्र गवराम कांदळकर, प्रभाकर पवार, विकास पवार,सहकारी राजीव साळवे ,आशा जगताप ,सत्यम पवार यांनी अभिनंदन केले पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांना अक्षय ढोले, माधव बढे ,श्रीराम भांगरे ,सुरेखा कडाळे या शिक्षकांनी वर्षभर जास्त तास घेऊन मार्गदर्शन केले.त्याबद्दल त्यांचेही परिसरातून कौतुक होत आहे.
