नाशिक मध्ये २४ मे ला १७४ व्या ख्रिस्ती वधू वर मेळाव्याचे आयोजन

Cityline Media
0
नाशिक प्रतिनिधी एकाच दिवशी एकाच ठिकाणी ख्रिस्ती पालकांच्या आग्रहास्तव संगमनेरच्या भोसले प्रतिष्ठानाच्या वतीने नाशकात रविवार दिनांक २४ मे रोजी दुपारी १२  वाजता १७४ व्या ख्रिस्ती वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मेळावा नाशिक मधील शरणपूर रोडवरील संत अंद्रिया चर्चमध्ये होणार आहे.या मेळाव्यात शार्लेट नाडे,डॉ. सुहासिनी जाधव, दिपा पवार, रेव्ह. सलोमी खरे, रोहिणी पंडित या मान्यवर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

सर्व पालक व विवाहच्छूकांना एकत्र आणून परस्पर संवाद साधून योग्य निर्णय घेण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या सेवभावी उपक्रमात अविवाहीत, विधवा, विधुर, घटस्फोटीत व अपंग यांनी आलेल्या सुवर्णं संधीचा फायदा घेऊन मेळाव्यात प्रत्यक्ष उपस्थित रहावे असे अवाहन संयोजक श्रीधर भोसले यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी  ७०८३९२०५२ संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!