किशोर वाघमारे यांची आरोग्य मित्र पदी निवड

Cityline Media
0
आश्वी प्रतिनिधी राहाता तालुक्यातील लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्ट अंतर्गत प्रवरा ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने गावोगावी रुग्णांना कमीत कमी दरामध्ये व शासनाच्या विविध आरोग्य योजना मिळाव्यात या दृष्टिकोनातून संगमनेर तालुक्यातील खळी पंचक्रोशीतून पत्रकार श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवसेना सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाप्रमुख किशोर वाघमारे यांची प्रवरा आरोग्य मित्र म्हणून नुकतीच निवड करण्यात आली.
 प्रवरा ग्रामिण रुग्णालय येथे मेडिकल कॉलेज येथे झालेल्या कार्यक्रमात प्रवरा मेडिकल ट्रस्टचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.जगदाळे व डॉ. पाटील आरोग्य अधिकारी डॉ. पालघर मलसर एम एस डब्ल्यू संजय आव्हाड मंगेश सातपुते  आदी प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीत किशोर वाघमारे यांना नुकतेच झालेल्या प्रवरा मेडिकल कॉलेज येथील कार्यक्रमात नियुक्तीपत्र व ओळखपत्र व प्रवरा मेडिकल येथे तपासणी करिता येणाऱ्या रुग्णांसाठी शेरा बुक आदी देऊन त्यांचा सत्कार करत निवडीची अधिकृत घोषणा मान्यवरांनी केली.

प्रवरा ग्रामीण रुग्णालयाची स्थापना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी ग्रामीण भागातल्या माझ्या गरीब कुटुंबातील माणसांना रुग्णसेवेचा चांगला लाभ व्हावा व मुंबई पुणे येथे न जाता आपल्या जवळील भागामध्ये आरोग्यसेवेचे चांगल्या सुविधा मिळावा या दृष्टिकोनातून १९७२ मध्ये प्रवरा ग्रामीण रुग्णालयाची स्थापना केली असून आज या रुग्णालयाची मोठा विस्तार झाला आहे.

दररोज हजारो रुग्णांना याचा फायदा होत असून प्रवरा ग्रामीण रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभाग वगळता बाकीच्या विभागांमध्ये पूर्णपणे मोफत उपचार केले जातात असून फक्त औषधाची पैसे स्विकारले जातात तसेच ६५ वर्ष वरील ज्येष्ठ नागरिकांना सर्व सुविधा मोफत असून त्यांनी आपली तपासणी करून परवाना ग्रामीण रुग्णालयाच्या तपासणी मोफत सेवेचा जास्तीत जास्त नागरिकांनी फायदा घ्यावा.

या रुग्णालयामध्ये उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतील नागरिकांनी सुविधा घ्याव्यात तसेच शून्य ते बारा वर्षापर्यंत लहान बालकांना सुंदर अशी आयसीओची व्यवस्था असून लहान मुलांच्या आजारासंदर्भात मोफत सर्व सुविधा असून त्याचाही फायदा जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा.

प्रवरा मेडिकल ट्रस्ट येथे साठी अत्यल्प दरामध्ये सुविधा उपलब्ध असून त्याचा पण फायदा येथील नागरिकांनी घ्यावा व आपलं उत्तम आरोग्य जगण्यासाठी प्रयत्न करावेत असे आव्हान येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.जगदाळे यांनी उपस्थित असणाऱ्या सर्व रुग्ण मित्रांना व प्रवरा आरोग्य मित्रांना केले असून त्यांनी आपल्या गावामध्ये प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या सर्व सुविधा नागरिकापर्यंत पोहोचून जास्तीत जास्त रुग्णांना याचा लाभ मिळवून द्यावा असे आवाहन यावेळी केले आहे.

 किशोर वाघमारे यांची निवड खळी पंचक्रोशीतून केली असून एक अनुभवी पत्रकारिता क्षेत्रांमध्ये व सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचे एक नाव असून ते उच्चशिक्षित असल्याने त्यांची प्रवरा आरोग्य मित्र म्हणून निवड केली असल्याची घोषणा डॉ. जगदाळे सर्व माहिती अधिकारी संजय आव्हाड यांनी केले आहे त्यांनी खळी पंचक्रोशीतून जास्तीत जास्त रुग्णांना प्रवरा ग्रामीण रुग्णालयाच्या लाभ मिळवून देऊन आरोग्य सेवा घरोघरी पोहोचवावे असे आवाहन करत त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!