नाशिक दिनकर गायकवाड नाशिक रोड येथील रोकडोबावाडी परिसरात सामाजिक व धार्मिक कार्याला नवी दिशा देणारी सकारात्मक घडामोड घडली आहे. सामाजिक कार्यकर्ते तथा पंचशील मिशनचे समन्वयक जयद्रथ काकडे यांनी बुद्धविहार उभारणीसाठी स्वतःच्या मालकीची जागा देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे.
यावेळी त्यांनी “मला बौद्ध बनायचं ही माझी जबाबदारी आहे” असा प्रेरणादायी संदेश देत समाजात धम्मकार्य वाढविण्याचे महत्त्व अधोरेखित केले.प्रस्तावित बुद्धविहारामुळे परिसरात धम्म,प्रबोधन, सामाजिक ऐक्य आणि संस्कारांचे केंद्र निर्माण होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.जयद्रथ काकडे यांच्या या सामाजिक योगदानाचे विविध स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
धम्मकार्याच्या माध्यमातून समाजात शांतता,समता आणि बंधुभाव वाढीस लागावा,अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
