माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत डि.पॉल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी

Cityline Media
0


श्रीरामपूर: दिपक कदम येथील विन्सेन्शन मिशन सर्विस सोसायटी संचलित डी.पॉल इंग्लिश मिडीयम हायस्कूलचा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा मंडळामार्फत माहे फेब्रू - मार्चमध्ये घेण्यात आलेल्या  एसएससी बोर्ड परीक्षेत शंभर टक्के निकाल लागला.असून या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी परीक्षेत उत्तुंग भरारी घेतली आहे.
शार्वी राजेश गोडगे ९६.६० शेकडा प्रथम 
परीक्षेत प्रथम क्रमांक कु.शार्वी राजेश गोडगे हिने (९५.६०टक्के) मिळवून पटकावला,तर द्वितीय क्रमांक चि.साई दिनेश कुऱ्हे (९५.२०टक्के), तृतीय क्रमांक कु.प्रणाली प्रकाश ताके (९१.२०टक्के), चतुर्थ क्रमांक कु.सृष्टी महेश मरकडे (९१.००टक्के), पाचवा क्रमांक 

कु.आयुषी शाम ढोकचौळे (९०.४०टक्के),सहावा क्रमांक चिं. कार्तिक भागचंद औताडे (९०.२०टक्के), तर विभागून सातवा क्रमांक कु.श्रावणी अनिल ओव्हळ व कु.मृणाल सतीश पैठणे यांनी प्रत्येकी (९०.००टक्के)गुण  मिळवत पटकावला. 
      साई दिनेश कुऱ्हे ९२.२० शेकडा द्वितीय
या शैक्षणिक वर्षी विद्यालयातील एकूण ४८ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी ३३विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले.तसेच १४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत,तर १ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाला. यशस्वी विद्यार्थ्यांनी उज्वल यशाची परंपरा कायम राखत पुन्हा एकदा डिपॉल स्टेट बोर्ड हायस्कूलच्या शिरपेच्यात मानाचा तुरा खोवला.व श्रीरामपूर तालुक्यात नावलौकिक मिळवला. यावेळी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका सुनयना भालेराव,रिटा ओबेराय,रंजना क्षीरसागर,रेणुका राऊत, हरविंदरसिंग सिद्धू ,शंकर बाहुले,दिपक अहिरे,अपील आल्हाट तसेच सर्वच शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

        यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून,श्रीरामपूर डिपॉल शाखेचे व्यवस्थापक फादर सिजो,फा.ऐबी,प्रशासक फा.फ्रँको, प्राचार्या सिस्टर ब्लेसा,सचिव मॉली कुथूर, लिपीक रवींद्र लोंढे,गणेश पवार, संदीप निबे,विकास वाघमारे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
          प्रणाली प्रकाश ताके ९१.२० तृतीय
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!