आश्वी प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील उच्चशिक्षित पुणे येथे नोकरीस असलेल्या आनंद यशवंत भालेराव (वय ५५) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.
त्याच्या पश्चात आई पत्नी मुलगी भाऊ भावजय चुलते चुलत भाऊ असा परिवार असून ते मालदाड येथील आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते नामदेव नंदू भालेराव मालदाड सेवा सोसायटीचे संचालक किसन नंदू भालेराव यांचे पुतणे होत.
सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक संस्थेचे जेष्ठ शिक्षक रामदास भालेराव व राहुरी कृषी विद्यापीठ येथील प्रा.संतोष भालेराव यांचे ते बंधू होते तर खळी येथील अहिल्यानगर जिल्हा शिवसेना शिंदे गटातील सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाप्रमुख पत्रकार किशोर वाघमारे यांचे ते मामेभाऊ होत त्यांच्या निधनाने मालदाड परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
