श्रीरामपूर लोणी मार्गे बस त्वरित सुरू करण्याची नागरिकांचे मागणी

Cityline Media
0
दाढ खुर्द किशोर वाघमारे श्रीरामपूर मुंबई लोणी निमगावजाळी मार्गे बस कोविडच्या काळापासून तीन ते चार वर्षापासून अचानक बंद केल्याने मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशाची मोठी हाल होत असून या मार्गाने जाणाऱ्या आरामदायी बस जास्त भाडे आकारत आहे कोविड काळापासून बंद झालेली श्रीरामपूर मुंबई ही बस त्वरित सुरू करावी अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.
विद्यार्थी,वृद्ध प्रवाशांना शासकीय सवलती पासून वंचित राहावे लागते महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिक महिलांसाठी अपंगासाठी विविध योजना घोषित केले आहे परंतु श्रीरामपूर मुंबई बस बंद असल्याने वरील नागरिकांना या योजनेपासून वंचित राहावे लागते तसेच लोणी येथे विविध शिक्षण संस्था असल्याने मुंबई येथील अनेक विद्यार्थी शिक्षण कामासाठी लोणी येथे मोठ्या प्रमाणावर आहे.

विद्यार्थ्यांना सुट्टीच्या कालावधीमध्ये मुंबईकडे जावे लागते व नागरिकांच्या महत्त्वाच्या कामासाठी मंत्रालय सारख्या ठिकाणी जाण्यासाठी बसची खूप गरज आहे परंतु ही  बस बंद असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो व या भागांमध्ये दोन ऐवजी चार आरामदायी बसेस जात असून हजार ते बाराशे रुपये प्रत्येकी एका प्रवाशाचे भाडे आकारत असुन याचा नागरिकांना खूप त्रास होतो त्यामुळे अहमदनगर येथील आगार प्रमुखांनी नागरिकाची अडचण समजून तात्काळ श्रीरामपूर आगर प्रमुख यांना आदेश करून श्रीरामपूर मुंबई बस सकाळी व संध्याकाळी तात्काळ सुरू करावी अशी मागणी येथील नागरिक वर्गांमधून केली आहे
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!