संगमनेर प्रतिनिधी पुरोगामी चळवळीत फुले शाहू आंबेडकर चळवळीची धार निर्माण करणारा संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील युवक चेहरा म्हणजे किशोर रुपवते सामाजिक संघटन घडवताना वेळोवेळी संघर्ष करून समाजातील बदलाला नवी दिशा देण्याचं आव्हान किशोर यांनी केले आहे.
सामान्य कुटुंबातील किशोर हा अत्यंत साधारण परिस्थितीत आपला उदरनिर्वाह करत आहे १९८३ मध्ये जन्म झालेला किशोर रुपवते परिवारासाठी वरदान ठरलेला आहे कारण शैक्षणिक जडणघडणीचा पाया निर्माण करण्यासाठी फुले शाहू आंबेडकर विचार समाजातील तळागाळात रुजवण्यासाठी किशोर नेहमी प्रयत्नशील असतो.
किशोरचे व्यावसायिक महत्त्व लक्षात घेता गवंडी काम करून सुद्धा चळवळीत मोठे योगदान देता येते याचा मृर्तीमंत उदाहरण म्हणजे किशोर होय किशोरकडे उपजत असलेले काही कला गुण आहेत त्या कलागुणामुळे किशोर सर्वांचा लाडका ठरतो कारण गायक कवी नृत्य आणि संगीत यांची लयबद्ध मांडणी किशोरमध्ये पहावयास मिळते.
सुरुवातीच्या काळात वाद्य पथक निर्माण करून किशोरने स्वतःचा एक चाहता वर्ग निर्माण केला होता दरम्यानच्या काळात फुले शाहू आंबेडकर चळवळीकडे किशोरचा पाय ओढला गेला तत्पूर्वीचा किशोर हा देव देवतांचा श्रद्धा जोपासणारा होता परंतु आत्ताचा किशोर त्यापासून खूप दूर गेला आणि पुरोगामी विचारांची मांडणी करण्यासाठी बुद्ध फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार तो जागी जागी मांडाव्यास लागला.
या कामी त्याला मोलाची साथ भेटली ते येथील तर्कनिष्ठ शिक्षक रुपवते रमेश रुपवते यांची एक साधारण व्यक्ती आहे परंतु चळवळीबद्दल त्यांची निष्ठा ही खूप मोठी आहे आणि अर्थातच चळवळीला एका शिलेदारास दुसरा शिलेदार मिळाला आणि चळवळीची गाडी जोरात सुरू झाली.
फुले शाहू आंबेडकर चळवळतील ज्ञान जनतेला सामाजण्यासाठी पाच हजार सम्राट वृत्तपत्राचा संग्रह करून वाचन करणारा किशोर आणि विविध ग्रंथ विकत घेऊन त्याचा त्याचे पारायण करण्याचे काम किशोरने केले आजही धम्म कार्यात किशोर सर्वात पुढे असतो कारण समाजाप्रती एक नाते आहे की ज्याच्याकडे ज्ञान आहे ते ज्ञान त्याने समाजाला दिले पाहिजे.
ज्याच्याकडे धन आहे त्यातील काही हिस्सा समाजाला दिला पाहिजे आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्यांनी समाजासाठी शांत राहून जे काही घडते त्याच्यावरती चिंतन केले पाहिजे या दृष्टिकोनातून रुपवते परिवार खांडगावच्या विकासाच्या बाबतीत आणि अडचणींचा सामना करून किशोर हा एक सल्लागार बनतो लहान-मोठे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी किशोर नेहमी अग्रेसर असतो.
किशोरच्या बाबतीत धम्मकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे आणि म्हणून धम्मकार्यास वाहून घेण्याचे किशोरने योग्य काम केलेला आहे अर्थातच किशोर यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू यांच्या विचारांचा पगडा असल्यामुळे किशोर.
भारतीय बौद्ध महासभेच्या बाजूकडे झुकला गेला आणि त्यानंतर किशोरचा प्रवास विज्ञानवादी दृष्टिकोनातून होऊ लागला किशोर आता सगळीकडे सामाजिक कार्यात अग्रेसर राहत आहे कोणाचे लग्न असो कोणाचे अंत्यविधी असो कोणाचे जलदान विधी!असो किशोर
आपल्या ओघवत्या वाणीने आपले विचार समाजापुढे मांडत आहे आणि समाजालाही त्याचे विचार पटत आहे किशोरच्या बाबतीत कौटुंबिक विचार करता या कामांमध्ये किशोरची पत्नी सौ.जयश्री यांची सुद्धा किशोरला खूप मोठी साथ मिळत आहे कारण कार्यकर्ता हा त्यागाशिवाय होत नाही तर त्याच्या मागे खूप मोठ्या लोकांचा त्याग असतो.
आणि ह्या त्यातूनच समाजकार्याची प्रेरणा मिळत असते अत्यंत छोटेसे असे घर त्या घरांमध्ये असलेला टापटीपपणा त्या घरामध्ये असलेले डॉ. बाबासाहेबांचे,गौतम बुद्धांचे प्रतिबिंब आणि आपले कौटुंबिक देवाणघेवाण विचार यातून किशोरचा एक खामक्या स्वभाव समाजापुढे आलेला आहे.
किशोरच्या स्वभावातच प्रामाणिकपणा आहे आणि त्यामुळे तो कधीही खोट सहन करू घेत नाही याचे वेळोवेळी आपणा सर्वांना अनुभव आलेले आहेत आपल्या सर्वांना मध्ये वागताना काही जर चुकीचे झाले तर त्याची खंत किशोरला नेहमी होत असते आणि त्यामुळे त्याचा संताप होत असतो हेही बाबत लक्षात घेण्यासारखे आहे.
किशोर रूपवते संगमनेर तालुक्यात परिचित असं व्यक्तिमत्व आहे की जे आपल्या कुटुंबाची घडी व्यवस्थित बसवून राहिलेल्या वेळात समाजकार्यासाठी वाहून घेणारे काम केलेल आहे कारण डॉ. बाबासाहेब म्हटले होते की जर तुम्ही स्वतः कमवू शकत नसाल तर तुम्ही चळवळ करणे चुकीचा आहे.
आणि म्हणून शिका संघटित व्हा संघर्ष करा हा नारा लक्षात घेऊन किशोरने स्वतः कौटुंबिक स्थिरता प्राप्त केली व त्यातच शक्य होईल तेवढं काम किशोर समाजाप्रती करत आहे किशोर च्या पुढाकाराने १२५ वी भीम जयंती उत्सव साजरा सुरुवात झाली त्याच्या अगोदर परिसरात भीम जयंती छोट्या प्रमाणात होत होती.
परंतु आज १३५ व्या जयंतीचे स्वरूप पाहिलं तर खांडगाव परिसरातील भीम सैनिकांच्या काळजातील जयंत्या ह्या दहा वर्षात घडून आणण्यासाठी किशोरने खूप मोठं योगदान दिलेला आहे या कामी मुंबईहून आलेले किशोरचे मेव्हणे शांताराम पवार यांनी किशोरला चळवळीकडे प्रवृत्त होण्यासाठी हाक दिली आणि त्या हाकेला किशोरने खूप मोठ्या मनाने सन्मान देऊन आज रूपवते परिवार हा जो आहे हा एक सामाजिक चळवळीतील आदर्श परिवार आदर्श समाज म्हणून संगमनेर तालुक्यात गणला जाईल या दृष्टीने किशोरचे नेहमीच उत्तम पाऊल पडत असते आज किशोरचा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त किशोरला भावी जीवनाच्या अनंत शुभेच्छा असेच प्रभावी काम किशोर कडून समाजाप्रती घडत जाऊ अशी अपेक्षा.
