संगमनेर प्रतिनिधी नितीनचंद्र भालेराव राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानातंर्गत अन्नधान्ये पिके,वाणिज्यिक पिके व कडधान्य आत्मनिर्भरता अभियान व राष्ट खाद्य तेल अभियान तेलबीया योजना अभियान २०२६-२७ अंतर्गत पिक प्रात्यक्षिकांसाठी, प्रमाणित बियाणे वितरण व मिनिकिटचे वितरणासाठी 'महाडीबीटी'वर अर्ज करण्यात यावे.असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. बोराळे यांनी केले आहे.खरीप हंगामातील कडधान्य, पौष्टिक तृणधान्य, भरडधान्य आदी पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी, तसेच आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने पीक प्रात्यक्षिक प्रमाणित बियाणे वितरण,तसेच मिनी किट वितरण आदी घटकांचा लाभदेण्यात येणार आहे.
हा लाभ राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान-अन्नधान्य पिके, वाणिज्यिक पिके व कडधान्य आत्मनिर्भरता अभियान तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलविया योजना सन २०२६-२७ अंतर्गत दिला जाणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी कृषी विभागाकडून संगमनेर तालुक्यात केली जात आहे.त्या अनुषंगाने पीक प्रात्यक्षिके प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. योजनांचा लाभ घेण्यासाठी शासनामार्फत नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांना अर्ज करण्यात येणार आहेत.
लाभार्थ्यांची निवड 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर करण्यात येणार आहे. संबंधित गटांच्या अधिकृत सदस्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. महाडीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळावर यासाठी शेतकरी व शेतकरी गट अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांकडे, तसेच लाभघेणाऱ्या गटातील सदस्यांकडे फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे.
यापूर्वी लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना पुढील दोन वर्षे लाभ नाही.तसेच योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.असे आवाहन कृषी सहाय्यक शिंदे ,हिवरगाव पावसा ग्रामपंचायत प्रशासक सुभाष गडाख यांनी केले आहे.
