बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सायखेडा बाजार समितीत ग्राहकांची बकरी खरेदीसाठी लगबग

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड  आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर निफाड तालुक्यातील सायखेडा उत्पन्न बाजार समिती येथे बकरी खरेदी-विक्रीसाठी मोठी लगबग पाहायला मिळाली पहाटेपासूनच परिसरात शेतकरी,व्यापारी तसेच ग्राहकांची मोठी गर्दी उसळली होती. 
विविध जातींच्या बकऱ्यांची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली. बाजारात स्थानिकांसह बाहेरील व्यापाऱ्यांनीही सहभाग घेतल्याने बाजारपेठ गजबजून गेली होती.आकर्षक रंगसंगती व उत्तम तब्येतीच्या बकऱ्यांना ग्राहकांची विशेष पसंती मिळत असून काही बकऱ्यांना चांगले दरही मिळत आहेत.बकरी ईद जवळ आल्याने पुढील काही दिवस बाजारातील गर्दीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!