पंचवटीच्या स्वामी विवेकानंद विद्यालयाचा माध्यमिक शालांत परीक्षेचा शंभर टक्के निकाल

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड नाशकातील पंचवटी येथील स्वामी विवेकानंद विद्यालय इंग्लिश मिडियम विद्यालयाने मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत शंभर टक्के निकालाची उज्ज्वल कामगिरी करत यशाची परंपरा कायम राखली आहे.
विद्यालयाच्या या दैदिप्यमान यशामुळे विद्यार्थ्यांसह पालक,शिक्षक व संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कु.देवयानी विश्वास जाधव  हिस ६२शेकडा गुण मिळाले आहे विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम गुणांसह यश संपादन करत शाळेचे नाव उंचावले.

विद्यार्थ्यांच्या मेहनतीला शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचे सहकार्य लाभल्याने हा अभिमानास्पद निकाल शक्य झाल्याची भावना विद्यालय प्रशासनाने व्यक्त केली.
यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून नातेवाईक,मित्रपरिवार तसेच महानगरपालिकेतील कर्मचारी बंधू-भगिनींकडूनही शुभेच्छा दिल्या जात आहेत.

पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
विद्यालयाच्या या यशाबद्दल परिसरातून समाधान व्यक्त होत असून “कष्ट, शिस्त आणि समर्पण” यामुळेच हे यश प्राप्त झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!