नाशिक दिनकर गायकवाड नायगाव येथील क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या टी. एस. दिघोळे माध्यमिक विद्यालयाचा एसएससीचा ९५ टक्के निकाल लागला असून नायगाव केंद्रात कु.धनश्री रमेश जेजुरकर प्रथम आली आहे.
तिला ९४.४०, शेकडा गुण मिळाले तर कुमार धम्मशालीन प्रवीण कर्डक ८९ शेकडा गुण मिळवून द्वितीय,आला कु प्राची जेजुरकर - ८८.२० शेकडा गुण प्राप्त करत तृतीय आली.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य शिवाजी आव्हाड,विभाग प्रमुख वाल्मीक पानसरे, सुनीता शिंदे,सुधीर सांगळे,कमलाकर चौधरी, योगेश गायकवाड, मारुती पाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
