देवगड विद्यालयाचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल शेकडा ९७.८२

Cityline Media
0
उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम 

संगमनेर नितीनचंद्र भालेराव तालुक्यातील जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे हिवरगाव पावसा येथील देवगड माध्यमिक विद्यालय शाळेतील विद्यार्थ्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवत शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. देवगड विद्यालयाचा मार्च २०२६ परीक्षेचा विद्यालयाचा  निकाल ९७.८२% लागला आहे.
या यशामध्ये विद्यार्थ्यांची मेहनत,शिक्षकांचे मार्गदर्शन,
पालकांचे सहकार्य व शाळेचे शिस्तबद्ध वातावरण महत्त्वाचे ठरले आहे.“यशाची परंपरा आमच्या शिक्षकांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे व विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केल्यामुळे शक्य झाले आहे.

भविष्यात देखील गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न राहील.”असे मुख्याध्यापिका श्रीम.सुनंदा उगले यांनी सांगितले.एस.एस.सी परीक्षेत विद्यालयातील प्रथम क्रमांक अक्षदा विकास पावसे (९४.४०%),
द्वितीय क्रमांक गौरी नारायण पावसे (८९.८०%),
तृतीय क्रमांक तन्मय अनिल पावसे (८९.२०%),
चतुर्थ क्रमांक कु.श्रावणी गणपत सोनवणे (८८.६०%),
पाचवा क्रमांक नैतिक मोहन पावसे (८७.००%) यांनी मिळवला आहे.

विशेष श्रेणी मध्ये औदुंबर डांगळे ८६.२०%,श्रद्धा गडकरी ८३.४०% ,यश गडाख ८२.४०%,तन्मय टेमगिरे ७९%, तन्मय पावसे ७८.८०%, साहिल पावसे ७८.६०%, श्रुतिका भालेराव ७७.८०%, श्रुती पावसे ७६%,अस्मिता पावसे ७५.४०%,आयुष रहाणे ७४.२०%, दिव्या पावसे ७३.६०%,पायल पावसे ७३.२०%,आलिया इनामदार ७२%  या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवले आहेत.

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत चमकदार यशाबद्दल जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी,सरपंच,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य,पोलीस पाटील,विविध संस्थांचे पदाधिकारी,ग्रामस्थ व पालक मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,आजी - माजी विद्यार्थी हिवरगाव पावसा यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!