पुण्यातल्या नाईट लाईफच्या दरीमुळे सर्वसामान्य संभ्रमित
पुणे दिनकर गायकवाड शहरात १४ दिवसांसाठी लागू करण्यात आलेल्या जमावबंदी आदेशामुळे हातावर पोट असणाऱ्या हॉकर, फेरीवाले व लहान व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.एकीकडे सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा येत असताना,दुसरीकडे उच्चभ्रू व्यावसायिकांची हॉटेल्स मात्र रात्री साडेअकरा वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
कायदा व सुव्यवस्था राखणे ही पोलिस प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी शहरात पोलिस गस्त वाढवावी, संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवावी,होमगार्डना काम द्यावे,गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून त्यांच्यात वचक निर्माण करावा. तसेच बेकायदेशीर धंदे,ड्रग्स माफिया आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर कठोर पायबंद घालणे आवश्यक आहे.
फक्त जमावबंदी आदेश लागू करून सर्वसामान्य जनतेवर अन्याय करणे योग्य नाही.प्रशासनाने सामान्य नागरिक,छोटे व्यावसायिक आणि हातावर पोट असलेल्या लोकांच्या अडचणी समजून घेत न्याय्य निर्णय घ्यावा,अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.
