संगमनेर प्रतिनिधी तालुक्यातील चंदनापुरी येथील मुळगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या पतसंस्थेत कार्यरत असलेले गावचे मा. सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र भालेराव यांची महाराष्ट्र राज्य पतसंस्था कर्मचारी संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
मा.सरपंच राजेंद्र भालेराव हे मा.मंत्री बाळासाहेब थोरात यांचे निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांनी चंदनापुरी गावाच्या विकासामध्ये खूप मोठे योगदान दिलेले आहे त्यांच्या पंचवार्षिक काळामध्ये गावांमध्ये मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी नेहमी ते अग्रेसर राहिले आहे.
कृतीशील जीवनात त्यांनी फुले शाहू आंबेडकर चळवळ जोपासण्याचे कामही केलेले आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ग्रामस्थांनी दोन पंचवार्षिक ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून दिलेले आहे सर्वसामान्यांचा नेता म्हणून त्यांची चंदनापुरी व पठार भागांमध्ये ख्याती आहे.
राजेंद्र भालेराव यांचे कुटुंब एक सामूहिक कुटुंब पद्धती मधील सर्व संपन्न कुटुंब आहे शेतीप्रधान असल्यामुळे शेती बरोबरच सामाजिक सहकाराची जाणीव असलेले नेतृत्व असल्यामुळे नेहमीच समाज हिताचे काम करण्यात ते अग्रेसर असतात.
आजही कुठेही रस्त्याचे वाद असो किंवा सामाजिक घडामोडी असो राजेंद्र भालेराव हे सामाजिक कार्यकर्ते सुखदेव भालेराव यांच्या बरोबर देखील नेहमी कार्यरत असतात आज त्यांची महाराष्ट्र राज्य पतसंस्था कर्मचारी संघटनेच्या उपाध्यक्षपदी फेर निवड झाल्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.
त्यांच्या निवडीबद्दल मा.मंत्री बाळासाहेब थोरात फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ विधीज्ञ वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड.किरण रोहम डॉ. सुधीर तांबे मा.आमदार सत्यजित तांबे डॉ. जयश्री थोरात चंदनापुरी गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक आर.बी.रहाणे कैलास सरोदे यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
