चंद्रापूर येथे एकादशीनिमित्त भाविकांचा महापूर
लोणी रुपाली भालेराव पवित्र एकादशीच्या मुहूर्तावर राहाता तालुक्यातील चंद्रापूर येथे भाविकांचा अभूतपूर्व महापूर पहायला मिळाला.या भक्तीमय वातावरणात येथील स्थानिक हनुमान मंदिर येथे ह.भ.प. सातारा येथील लिनीताई महाराज सानप(खाडे) यांच्या सुश्राव्य हरिकीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले होते.
हे हरिकीर्तन अत्यंत उत्साहात आणि भाविकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत पार पडले लिनीताई महाराजांनी आपल्या रसाळ वाणीतून कीर्तन सेवा सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले आणि संपूर्ण परिसर हरिनाम गजराने दुमदुमून गेला
या सोहळ्याचे विशेष औचित्य साधून ह.भ.प. बाळासाहेब महाराज साबळे यांच्या हस्ते कीर्तनकार ह.भ.प. लिनीताई महाराज सानप यांना विठ्ठल-रुक्मिणीची देखणी मूर्ती देऊन त्यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
किर्तनाचा मुख्य कार्यक्रम पार पडल्यानंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी फराळ आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाची सेवा सौ. आशा घोरपडे आणि सौ. माया मुळेकर यांनी दिली,ज्याचा लाभ सर्व उपस्थितांनी घेतला.
या मंगलमयी धार्मिक कार्यक्रमास परिसरातील अनेक मान्यवर आणि प्रतिष्ठित मंडळींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.यामध्ये प्रामुख्याने पांडु बनसोडे,नारायण कहार, अशोक दहिवळकर, बापुसाहेब तांबे, नानासाहेब मनकर, रामनाथ काळे,रामदास तांबे आणि पोपट मनकर उपस्थित होते.
अध्यात्मिक क्षेत्रातील अनेक साधू-संत आणि महाराजांची देखील यावेळी उपस्थिती होती या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थिती लाभली. यामध्ये आण्णा महाराज लोंढे,बाळासाहेब महाराज कदम,अशोक महाराज गोत्राळ,मच्छिंद्र महाराज धावणे दत्तात्रय महाराज तांबे,नामदेव महाराज विखे,गोकुळ महाराज कडलग,वैष्णव महाराज गुंजाळ, यज्ञश्री कडलग,विमल तांबे आणि मंगल गोरे आदी उपस्थित होते.
या संपूर्ण सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन आणि शेवटी उपस्थितांचे आभार प्रदर्शन ह.भ.प. मायराज महाराज अनर्थे (चंद्रापूरकर) यांनी मानले.सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे हा सोहळा अत्यंत भक्तीमय आणि यशस्वी वातावरणात पार पडला.
