अहिल्यानगर पोलिस दलातील कर्तव्यदक्ष खाकीचा गौरव

Cityline Media
0
-१६ वर्षांच्या सेवेनंतर अनिल शेंगाळे यांचे पोलीस हवालदारपदी बढती.
​१३ वर्षे गोपनीय विभागात यशस्वी कामगिरी;अकोले, आश्वी,श्रीरामपूरसह अपर पोलीस अधीक्षक कार्यालयात बजावली सेवा

​आश्वी संजय गायकवाड कर्तव्यनिष्ठा,अचूक कार्यपद्धती आणि पोलीस दलाप्रती असलेल्या सातत्यपूर्ण समर्पणाच्या जोरावर अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात तब्बल १६ वर्षे उल्लेखनीय सेवा बजावणारे धडाडीचे पोलीस अंमलदार अनिल शेंगाळे यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची मोठी पावती मिळाली आहे. जिल्हा पोलीस दलात 'पोलीस नाईक' म्हणून कार्यरत असणाऱ्या शेंगाळे यांना 'पोलीस हवालदार' पदावर मानाची पदोन्नती देण्यात आली आहे.
या पदोन्नतीमुळे त्यांच्यावर सर्वच स्तरांतून कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.​
-शिक्षणाचा दर्जा अन् पुणे ते अहिल्यानगर प्रवास ​मूळचे पुणे जिल्ह्यातील जुन्नर  तालुक्यातील नळवणे गावचे रहिवासी असलेले आणि सध्या राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर  येथे स्थायिक असलेले अनिल शेंगाळे हे उच्चशिक्षित आहेत.

 त्यांनी कला शाखेची पदवी पर्यंतचे उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षणाची उत्तम पार्श्वभूमी आणि खाकी वर्दीची असलेली आवड यांमुळे त्यांनी नगर जिल्हा पोलीस दलात भरती होऊन आपल्या पोलीस सेवेचा यशस्वी प्रवास सुरू केला.

तर ​१३ वर्षे गोपनीय विभागात मोलाचे योगदान देत ​आपल्या १६ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनिल शेंगाळे यांनी अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गोपनीय विभागात सलग १३ वर्षे सेवा बजावली. गुन्हेगारीला वेसण घालणे,कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गुप्त माहितीचे जाळे विणणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना अचूक इनपुट देणे यात त्यांनी नेहमीच मोलाची भूमिका बजावली.​

त्यांनी आपल्या सेवाकाळात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे. यामध्ये:​अकोले पोलीस ठाणे ​आश्वी पोलीस ठाणे ​श्रीरामपूर ग्रामीण पोलीस ठाणे या ठिकाणी त्यांनी अत्यंत चोखपणे कर्तव्य पार पाडले.

सध्या ते अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, श्रीरामपूर येथे अत्यंत महत्त्वाच्या जबाबदारीवर कार्यरत आहेत.​यावेळी वरिष्ठ अधिकारी अन् सहकारी मित्रांच्या उपस्थितीत सत्कार ​त्यांच्या या गौरवपूर्ण पदोन्नतीबद्दल श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक  सोमनाथ वाकचौरे, पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त धोंडे, तसेच आप्पासाहेब खंडाळ आणि राजेंद्र गोडगे आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अनिल शेंगाळे यांचे विशेष कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

​या आनंदोत्सवाप्रसंगी त्यांचे सहकारी व स्नेही पोलीस हवालदार रविंद्र चव्हाण, पोलीस हवालदार रामेश्वर ढोकणे, पोलीस हवालदार सचिन धनाड, तसेच रामेश्वर वेताळ, काका मोरे,संदिप दरंदले, किशोर हिंगे, संभाजी वरे,सचिन शेळके आणि सतिष पठारे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी शेंगाळे यांना पुष्पगुच्छ देऊन भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
​एक संयमी,अभ्यासू आणि खाकी वर्दीची शान वाढवणारा पोलीस अंमलदार अशी ओळख असलेल्या अनिल शेंगाळे यांच्या पदोन्नतीमुळे राहुरी, श्रीरामपूर,आश्वी आणि अकोले परिसरातील नागरिक तसेच पोलीस वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!