एस.टी महामंडळ अभियानात लोणी बसस्थानक विभागात अव्वल

Cityline Media
0
५ लाख रुपयांचे पारितोषिक आणि वाहतूक नियंत्रक रावसाहेब पर्वत यांना 'लालपरी गौरवरत्न पुरस्कार' प्रदान

लोणी रुपाली भालेराव महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात अत्यंत प्रतिष्ठेचे 'हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ,सुंदर बसस्थानक अभियान' राबविण्यात आले होते. या राज्यव्यापी मोहिमेमध्ये नाशिक विभागातून लोणी बसस्थानकाने आपल्या उत्कृष्ट व्यवस्थापन,उत्तम प्रवासी सुविधा आणि उत्कृष्ट स्वच्छतेच्या जोरावर प्रथम क्रमांकाचे मानाचे पारितोषिक पटकाविले.
या यशाबद्दल महामंडळाकडून लोणी बसस्थानकाला तब्बल ५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक आणि भव्य स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.नाशिक येथे १ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिन सोहळ्यात हा बहुमान प्रदान करण्यात आला.

हा शानदार पुरस्कार सोहळा नाशिक प्रदेशचे व्यवस्थापक विजय गिते यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी नाशिकचे विभाग नियंत्रक श्री. क्षीरसागर आणि यंत्र अभियंता श्री.शेळके प्रामुख्याने उपस्थित होते. लोणी बसस्थानकाच्या वतीने हा मानाचा पुरस्कार आगार व्यवस्थापक  प्रशांत गुंड आणि लोणी बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक रावसाहेब पर्वत यांनी मान्यवरांच्या हस्ते स्वीकारला.

संपूर्ण बसस्थानक परिसर स्वच्छतेने परिपूर्ण असा दिसतो आणि प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यात लोणी आगाराच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मोठे योगदान दिले होते.याच सोहळ्यात लोणी बसस्थानकासाठी आणखी एक अभिमानास्पद क्षण पाहायला मिळाला.

आपल्या कर्तव्यात सातत्य आणि उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल लोणी बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक रावसाहेब पर्वत यांना राज्य परिवहन महामंडळाचा विशेष 'लालपरी गौरवरत्न पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले.

नाशिक प्रदेशचे मा.व्यवस्थापक विजय गिते यांच्या हस्ते रावसाहेब पर्वत यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान प्रदान करण्यात आला.या दुहेरी मुकुटामुळे संपूर्ण लोणी परिसरात एसटी प्रशासनाचे नाव उंचावले आहे.

लोणी बसस्थानकाने मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल आणि वाहतूक नियंत्रक रावसाहेब पर्वत यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.राज्याचे जलसंधारण मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, मा.खासदार डॉ.सुजय विखे पाटील,मा. जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील तसेच अहिल्यानगरचे विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप यांनी या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त करत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले.

यासोबतच लोणी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि लोणी बुद्रुक येथील समस्त ग्रामस्थ यांनी वाहतूक नियंत्रक रावसाहेब पर्वत व वाहतूक नियंत्रक श्री. कानकाटे,आगार व्यवस्थापक प्रशांत गुंड या सर्वांचे अभिनंदन केले वाहतूक नियंत्रक रावसाहेब पर्वत यांच्यासह संपूर्ण बसस्थानक कुटुंबाचे मनापासून अभिनंदन केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!