जलजीवन मिशन अंतर्गत निकृष्ट कामांच्या चौकशीसाठी राहुरीत आंदोलन

Cityline Media
0
राहुरी प्नतिनिधी राहुरीचे जलजीवन मिशन नसून कमिशन योजना आहे अशा घोषणा देत, जलजीवन मिशन अंतर्गत अपूर्ण व निकृष्ट कामांची चौकशी करून संबंधित कामे तात्काळ पूर्ण करण्याबाबत तसेच पाणी टंचाई असलेल्या भागाला तात्काळ पिण्याचे पाणी उपलब्ध करणे,पाणी प्रश्नाकडे आणि शासन प्रशासनाच्या मनमानी धोरणाच्या विरोधात नुकतेच तालुक्यातील नागरिक समविचारी संघटनाचे कार्यकर्ते यांनी पंचायत समिती व तहसील कार्यालयावर मोर्चा काढून पाणी हक्क आंदोलन करण्यात आले.
या वेळी कुंभ मेळा नको,जलजीवन हवे! शक्तीपीठ,ग्रीनफिल्ड महामार्ग नको, जलजीवन हवे हक्काचे ५५ लिटर शुद्ध पाणी मिळालेच पाहिजे जलजीवन योजनेचे काम पूर्ण केलेच पाहिजे! निधीचे कारण सांगून योजनेचे काम बंद करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो!दोन दोन आमदारांचं करायचं काय? या घोषणांनी राहुरी शहर दणाणून सोडले केंद्र शासन व राज्य शासनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलजीवन मिशन योजना राबविण्यात येत आहे.

तथापी,राहुरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये या योजने अंतर्गत मंजूर करण्यात आलेली कामे अपूर्ण अवस्थेत आहेत.काही ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे झाल्याच्या तक्रारी आहेत,तर काही ठिकाणी निधी उपलब्ध नसल्याचे कारण सांगून कामे बंद पडलेली आहेत. परिणामी,नागरिकांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.

आंदोलनाच्या निधनामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत राहुरी तालुक्यातील सर्व अपूर्ण कामांचा आढावा घेऊन ती तात्काळ पूर्ण करण्यात यावीत,निकृष्ट दर्जाची कामे झाल्याच्या तक्रारींची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी,दोषी अधिकारी,कर्मचारी व कंत्राटदार यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात यावी.

निधीअभावी बंद पडलेली कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा, प्रत्येक गावामध्ये जलजीवन मिशनच्या कामांची माहिती,मंजूर निधी व कामांची सद्यस्थिती सार्वजनिक करण्यात यावी.

नागरिकांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना तात्काळ करण्यात याव्यात.आदी मागण्या करण्यात आल्या.तसेच पाणी टंचाई असलेल्या भागाला तात्काळ पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी पंचायत समितीच्या समोर बैठक करण्यात आली.

या बैठकीत चिंचाळा येथील कौठेवाडी,पारधे वस्ती, चिपचिवाडी, सोंड्याचिवाडी,तसेच वावरज येथील साहेबरावचीवाडी, पुनोबाचीवाडी, कळवातणीचा दरा, तारवाडी, गावठाण,मौजे बुलेपठार येथील कुराणदरा, माकनदरा (केदारवस्ती),झिरेदरा,दुधवडे वस्ती, जांभळी येथील बन्सीची वाडी,सात्रळ येथील वॉर्ड क्र.४, वरशिदे येथील बाखरवाडी च्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या बद्दल निवेदने देऊन चर्चा करण्यात आली.

तातडीने वस्तीचा सर्व्हे करून प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश ग्रामसेवकांना देण्यात आले. नायब तहसीलदार श्रीमती दळवी यांनी स्थानिक पाण्याच्या पाण्याची अडचण तातडीने सोडविणे संदर्भात ग्रामसेवक यांचेमार्फत पंचायत समितकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यास तातडीने टँकर ने पाणी पोहचविण्याची कार्यवाही करण्यात येईल.अशा सूचना प्रशासनाला दिल्या असल्याचे सांगितले. 
    
पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क असून, या प्रश्नाबाबत शासन प्रशासनाने संवेदनशीलता दाखवून तातडीने कार्यवाही करणे आवश्यक आहे.अन्यथा जनतेच्या लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त होऊ शकते असा इशारा या आंदोलनातून देण्यात आला.

या आंदोलनात राहुरी तालुक्यातील विविध गावांतील नागरिक,महिला, युवक व सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. देवराम जाधव,श्रीराम विधाते,निखिल जाधव,महेश साळवे,संदीप कोकाटे, वर्षा बाचकर,अमर जाधव,

कैलास बुळे, राजु जाधव,पंकज पलघडमल, रत्नमाला मकासरे, मंदाबाई बर्डे, नाना भले, गंगाराम वाघ, भारत केदार, काशीनाथ कोकाटे, संकेत कोरडे, विवेक तळपे, आदित्य साळवे, शांताराम आंबेकर, राहुल वायळ, युवराज मधे,

संदीप मधे, लक्ष्मण वाघ,बंडू वायळ, तुकाराम लेंभे, गोविंद गवारी, डॉ पूनम साबळे, मच्छिंद्र दुधवडे, गुलाब शिंदे, पोपट मेंगाळ, सुमन मधे, सोमनाथ केदार, रुभाबाई केदार, भीमराज मधे, सयाबाई केदार, नाना पारधे, शीतल जाधव,

हिरामण जाधव, गणेश काळे, अरुण काळे, ताराचंद काळे, दिगंबर काळे मंगल पारधे, स्वाती काळे, सोनाली काळे, लीलाबाई भले, साईत्राबाई जाधव, गीताबाई जाधव, माया भले, निर्मला काळे, दगडाबाई काळे, देवजी गावडे, सुभाष केदार, पर्बत केदार, सुनीता जाधव, ज्योती जाधव आदी पाणी हक्क संघर्ष समिती,च्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित होते..
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!