नाशिकच्या केवडी बन परिसरात सुटकेस मध्ये महिलेचा मृतदेहाने खळबळ

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड एकीकडे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसरात विकास कामांची जोरदार रेलचेल सुरू असतानाच दुसरीकडे मंगळवारी सकाळी एक थरारक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील केवडी बन परिसरात असलेल्या कृषी गो सेवा ट्रस्ट गो शाळेजवळ एका सुटकेस मध्ये आणि गोणीत अत्यंत क्रूरपणे भरून ठेवलेला दुर्गंधीयुक्त महिलेचा मृतदेह  आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
नुकतेच सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. परिसरात काम करणाऱ्या ग्लोबल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना  अचानक तीव्र दुर्गंधी येऊ लागली.संशय आल्याने कर्मचाऱ्यांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता, त्यांना एक संशयास्पद सुटकेस व गोणी दिसून आली. ती उघडून पाहिली असता त्यात मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. कर्मचाऱ्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली.

हत्या करून मृतदेह फेकल्याचा संशय
मृतदेह सुटकेसमध्ये गोणीत भरून फेकण्यात आल्याने ही स्पष्टपणे हत्येची घटना असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब झालेली असून तीव्र दुर्गंधी सुटली आहे. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असता हा मृतदेह महिलेचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.तर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व तपासाच्या अनुषंगाने तपासाची चक्रे फिरवली. याशिवाय घटनास्थळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते.

ओळख पटवण्याचे आव्हान दरम्यान मृत्यूचे नेमके कारण आणि मृत्यू कधी झाला, हे शोधण्यासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तसेच या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी परिसरातील आणि जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.सिंहस्थाच्या कामांमुळे सध्या तपोवन परिसरात मजुरांची आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते,अशा गजबजलेल्या भागात सुटकेसमध्ये गोणीत भरलेला मृतदेह आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस सध्या सर्व बाजूंनी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!