उपवर्गीकरण विरोधात सरकारचा रडीचा डाव संगमनेरात उधळणार;महाएल्गार

Cityline Media
0
केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात समविचारी संघटनाची एकजूट

२ जुलैच्या आंदोलनासाठी उद्या महाबैठक..

संगमनेर प्रतिनिधी अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करून आरक्षण संपवण्याच्या केंद्र सरकारच्या डावाविरोधात २ जुलै २०२६ रोजी संगमनेरात पुकारलेल्या महाएल्गार आंदोलनाच्या नियोजनासाठी तालुक्यातील सर्व आंबेडकरी व बौद्ध पक्ष-संघटनांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक उद्या, दि.१८ जून  रोजी सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृह, संगमनेर येथे होणार आहे.संविधान बचावासाठी एकजूट"उपवर्गीकरण हा संविधानाच्या अनुच्छेद ३४१ वरील थेट हल्ला आहे.बाबासाहेबांनी दिलेल्या अनुसूचित जातीच्या एकसंघ यादीचे तुकडे करून 'फोडा आणि राज्य करा' नीती राबवली जात आहे.हे आम्ही कदापि सहन करणार नाही," असा इशारा संगमनेर तालुका अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी कृती समितीने दिला आहे.

सर्वपक्षीय सहभाग, निर्धार एकच
या बैठकीला तालुक्यातील सर्व रिपब्लिकन गट, आंबेडकरी पक्ष,बौद्ध संघटना, भीम आर्मी, युवा पँथर्स,विद्यार्थी व महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह चळवळीतील जेष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. २ जुलै रोजी होणारा "संगमनेर बंद" व "जेलभरो सत्याग्रह" यशस्वी करण्यासाठी गावोगावी जनजागृती, प्रचार व कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्या या बैठकीत निश्चित केल्या जाणार आहेत.

"आता गट-तट, मान-पान बाजूला ठेवून एकजुटीने लढण्याची वेळ आली आहे.कारण प्रश्न आपल्या पुढच्या पिढीच्या घटनात्मक हक्काचा आहे," असे आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

बैठकीचे तपशील दिनांक: १८ जून , बुधवार 
वेळ: सकाळी ११ वाजता स्थळ शासकीय विश्रामगृह,संगमनेर तालुक्यातील समस्त आंबेडकर अनुयायी, बौद्ध बांधव, माता-भगिनी व भीमसैनिकांनी या निर्णायक बैठकीस हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!