वडगाव पान प्नतिनिधी तालुक्यातील वडगांवपान येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आदिवासी महादेव कोळी समाज बांधव अहिल्यानगर व संगमनेर तालुका तसेच सप्त दर्या विशेषांकाचे संस्थापक भाऊसाहेब तथा शिवाजी सोनवणे यांच्या संकल्पनेतून इयत्ता १० वी व १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सोहळा नुकताच पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा मंगेश शिरसाठ यांनी स्विकारले प्रमुख पाहुणे म्हणून लष्कर सुभेदार विजयकुमार शिंदे,शाहिर विजय लांडगे,गणेश वेलजाळी,दिगंबर मैड, लष्कर सुभेदार रावसाहेब शेरमाळे, प्रभाकर गेठे,सुहास मोरे, शिवाजी मेढे,रविंद्र घाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब सोनवणे यांनी केले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उपस्थित करण्यात आले.
प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी विद्यार्थींना सुंदर फेटे अमोल म्हसे यांनी बांधले विद्यार्थ्यांना महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तक,सुंदर स्मृतीचिन्ह, पुष्पगुच्छ पालकांसमेत प्रदान करण्यात आले.
