कोंची जिल्हा परिषद शाळेत नवागताचे उत्साहात स्वागत

Cityline Media
0
संगमनेर प्रतिनिधी तालुक्यातील कोंची गावातली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शैक्षणिक वर्षासाठी अति उत्साहाने नुकतीच सुरु झाली.
प्रसंगी विद्यार्थ्यांच्या स्वागत प्रित्यर्थ अंगणवाडी सेविकांसह शाळेतल्या सर्व शिक्षकांनी स्वखर्चाने प्रत्येक वर्गासमोर विविधरंगी फुलांची सुरेख मांडणी केली होती.पहिलीच्या वर्गात अर्थात जि. प. शाळेत प्रथमच प्रवेश घेतलेल्या नवागताचे  स्वागत गुलाबपुष्प व डोक्यावर सौंदर्य मुगुट चढवून करण्यात आले.
इतर इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके व गणवेश वाटप करण्यात आले.शाळेच्या प्रथम दिना निमित्ताने सगळ्या विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात आले. मुख्याध्यापक शेळके शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतल्या सर्व उत्साही शिक्षकांनी हा कार्यक्रम घडवून आणल्याबद्दल भोसले प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीधर भोसले यांच्या अध्यक्षीय उपस्थितीत बाल विदयार्थ्यांनी व उपस्थित पालकांनी आनंद व्यक्त करून दीर्घ वेळ टाळ्यांचा कडकडात केला. कोंचीतल्या जिल्हा परिषद शाळेला अनुभवी व प्रशिक्षित शिक्षक वर्ग असल्याने पालक सुद्धा समाधानी असल्याचे यावेळी दिसून आले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!