राहुरीचे जलजीवन मिशन नसून कमिशन योजना

Cityline Media
0
राहुरी प्नतिनिधी राहुरी"जलजीवन मिशन योजनेचे अपूर्ण व निकृष्ट कामांविरोधात तसेच तत्काळ पाण्याचे पाणी उपलब्ध करणे आणि सरकारच्या मनमानी धोरणा विरोधात ठरवलेल्या आंदोलनाचे निवेदन तालुक्यातील नागरिक आणि विविध समविचारी संघटनाचे कार्यकर्ते यांच्या वतीने नुकतेच तहसीलदार डॉ अमित पवार,राहुरी व गटविकास अधिकारी तायडे,उपअभियंता ग्रामीण पाणी पुरवठा राहुरी यांना सादर करण्यात आले.
या वेळेस अनेक नागरिक,कार्यकर्ते निवेदन सादर करण्यासाठी उपस्थित होते. कौठेवाडी चिंचाळा, वरशिदे,सात्रळ,बुळे पठार, कोळेवाडी येथील पाणी प्रश्न बाबत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंते प्रशांत जयभाये यांच्याही निवेदन सादर करून चर्चा झाली.

प्रसंगी अधिकाऱ्यांनी त्यांच्या पातळीवर असलेले स्थानिक प्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.राज्यातील २५००० योजना अपूर्ण आहेत. ३१ कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. गरज नसतांना ३५ हजार कोटी रुपये कुंभ मेळावर खर्च केला जाणार आहे.

नको असलेले आणि जनतेचा तीव्र विरोध असले नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गावर १ लाख कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. आणि जलजीवन मिशन करता निधी नसल्याचे शासन प्रशासनाकडून सांगितले जात आहे. हे सरकार ढोंग करत आहे. जलजीवन मिशन योजनेच्या नावाखाली भाजप सरकारकडून नागरिकांची मोठी फसवणूक सुरू असून ठेकेदार आणि पक्ष पुढाऱ्यांचे खिसे गरम करण्यासाठी या योजनेचा घाट घातला आहे.

पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली भावनिक बनवून क्रूर चेष्ठा भाजप सरकार करत आहे.ही योजना मिशन नसून कमिशन झाली असल्याचा  आंदोलनाच्या संयोजकानी आरोप केला आहे. मान्सून लांबला आहे. दुष्काळ वाढत आहे.

 शासनाने कुठलीही पूर्वतयारी किंवा उपाययोजना केलेली नाही.जनतेच्या पैशाची उधळपट्टी सुरू आहे.संविधानाने नागरिकांना दिलेला पाण्याचा मूलभूत हक्क जनतेला उपलब्ध करून देण्यात निष्क्रिय ठरलेल्या सरकारच्या विरोधात दिनांक २२ जून २०२६ रोजी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे..

देवराम जाधव, कैलास बुळे, निखिल जाधव,वर्षा बाचकर,संदीप कोकाटे, पंकज पलघडमल, सुभाष नंदकर, आदित्य साळवे, युवराज मधे, किसन काळे, विवेक तळपे,बंडू वायळ,उस्मान शेख, सचिन विधाते.मधुकर विधाते, पंकज पलघडमल,सोमा काळे, मुरलीधर काळे,इत्यादी नागरिक व कार्यकर्ते आदी होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!