प्राथमिक शाळेतील विद्यार्थी गिरवणार डिजिटल तंत्रज्ञानाचे धडे
संगमनेर नितीनचंद्र भालेराव ग्रामीण भागात शिक्षणाला चालना देण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत मिशन आपुलकी अंतर्गत तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला सुयोग गुंजाळ
श्री गुंजाळ हे कमिन्स इंक.कोलंबस,इंडियाना, अमेरीका या कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत आहे.शाळेचे माजी विद्यार्थी प्रवीण सुभाष गडाख यांच्या माध्यमातून त्यांचे मित्र सुयोग गुंजाळ यांनी थेट यु.एस.ए.मधून संगणक भेट दिल्यामुळे शाळेतील विद्यार्थी भरवले आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थी या उपक्रमामुळे डिजिटल शिक्षणाचे धडे गिरवणार आहेत.
सध्याचे युग माहिती तंत्रज्ञानाचे असून सर्वच ठिकाणी संगणकाचा उपयोग होत आहे. डिजिटल इंडियाच्या स्वप्नपूर्तीसाठी शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना संगणक हाताळण्याचे कौशल्य प्राप्त झाले पाहिजे.
जिल्हा परिषद शाळेत संगणकाची प्राथमिक गरजच अपूर्ण होती.डिजिटल इंडियाच्या स्वप्न पूर्तीसाठी सुयोग गुंजाळ यांनी खारीचा वाटा उचलला आहे.खासगी शाळांच्या तुलनेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील शैक्षणिक दर्जा फारसा उच्च नसतो.तसेच भौतिक सुविधा फारशा उपलब्ध नसतात अशी ओरड नेहमीच होत असते.
शासनाच्या विविध योजनेतून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत आता भौतिक सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. यासोबतच जिल्हा परिषद शाळांना मोफत संगणक संच व अन्य साहित्य पुरविण्याचा अनोखा उपक्रम माझे मित्र सुयोग गुंजाळ यांनी विशेष पुढाकार घेतला आहे असे स्पष्ट करत याप्रसंगी प्रवीण गडाख यांनी पुढे बोलताना सांगितले की यापुढेही संगणक उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत राहू.तसेच शाळेसाठी आय.सी.टी लॅब व सुसज्ज असे ग्रंथालय व प्रयोगशाळा निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्याध्यापक रहाणे यांनी सांगितले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची ओळख होणार असून त्यांचे शैक्षणिक गुणवत्तेत विकास होण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची संधी निर्माण करणारा हा उपक्रम ठरेल.असे मुख्याध्यापक आर.पी.रहाणे यांनी म्हटले आहे.
शाळेत संगणक उपलब्ध करून दिल्याबद्दल संगमनेर तालुका गटशिक्षणाधिकारी श्री.गुंड, विस्तार अधिकारी श्रीमती नंदा वलवे, केंद्रप्रमुख स्मिता धनवटे यांनी अभिनंदन केले.तसेच सुयोग गुंजाळ व प्रवीण गडाख यांचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद पावसे.
उपाध्यक्ष सोमनाथ भालेराव व सर्व सदस्य सरपंच तथा प्रशासक सुभाष गडाख,उपसरपंच सुजाता दवंगे,ग्रामविकास अधिकारी हरीश गडाख,माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष गणपत पावसे, राजहंस दूध संघाचे संचालक डॉ.प्रमोद पावसे,
गणेश दवंगे,केशव दवंगे,प्राध्यापक बाबुराव पावसे, किरण पावसे,हॉटेल मयूरचे संचालक रामनाथ पावसे,डॉ.संदीप पावसे,रमेश पावसे,नितीन भालेराव,आप्पासाहेब गडाख,
दिगंबर पावसे,सचिन सस्कर,
रामनाथ गडाख,अनिल गडाख,सचिन पावसे, डॉ.रमेश पावसे,गोकुळ गडाख,नारायण पावसे, सुशीला पावसे,मंगल पावसे,सुवर्णा हासे,भीमाशंकर पावसे,यांच्या सह मुख्याध्यापक आर.पी.राहणे शिक्षक अक्षय खतोडे, हरिभाऊ सहाने,श्रीमती मीनल बिडवे,श्रीमती वाकचौरे व इतर ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
