संगमनेर प्रतिनिधी कोणत्याही समाजाच्या कामकाजात वकील महत्त्वाची भूमिका बजावतात.ते न्यायाचे रक्षक,व्यक्ती व संस्थांचे वकील आणि कायदेशीर बाबींमध्ये सल्लागार म्हणून काम करतात त्यांच्या उपस्थितीमुळे कायद्याचे राज्य टिकून राहते,हक्कांचे संरक्षण होते आणि विवाद सुव्यवस्थित व न्याय्य पद्धतीने सोडवले जातात समाजातील शोषित वंचित आणि दुर्लक्षित घटकांना माणूस म्हणून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे घडपडतात तेच खऱ्या अर्थाने लोकहित विधिज्ञ होतात.
मराठी माध्यमाच्या शाळेतून शिक्षण घेत,जिद्द आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर यशाचे शिखर गाठता येते,याचे उत्तम उदाहरण म्हणजे संगमनेर तालुक्यातील चणेगाव येथील ॲड.कु. तेजस्विनी विलास दिघे.त्यांनी पदवीनंतर कायद्याच्या शिक्षणात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन आपल्या कुटुंबाचे,गावाचे आणि समाजाचे नाव अभिमानाने उज्ज्वल केले आहे.वकिलीसारख्या जबाबदारीच्या आणि प्रतिष्ठेच्या क्षेत्रात त्यांनी यशस्वी पाऊल टाकून एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.
तेजस्विनी यांच्या या यशामागे त्यांची सातत्यपूर्ण मेहनत, चिकाटी आणि शिक्षणाविषयीची निष्ठा आहे. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी त्यांचा प्रवास तितकाच प्रेरणादायी असून, विशेषतःग्रामीण भागातील मुलींसाठी तो आशेचा किरण ठरतो.
ज्ञानाच्या बळावर कोणतेही ध्येय साध्य करता येते,हा संदेश त्यांच्या यशातून स्पष्टपणे दिसून येतो. तालुक्यातील चनेगाव पंचक्रोशीतील प्रथम महिला विधिज्ञ म्हणून त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.त्यांचे हे यश केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण गावासाठी अभिमानाची बाब आहे.
त्यांच्या कर्तृत्वामुळे अनेक तरुणांना शिक्षणाची प्रेरणा मिळेल आणि समाजात सकारात्मक बदल घडेल.ॲड.तेजस्विनी विलास दिघे यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांचे समाजाच्या विविध स्थरातून शुभेच्छा आणि अभिनंदन केले जात आहे.
तेजस्विनी यांनी न्याय,प्रामाणिकपणा आणि समाजसेवेच्या माध्यमातून वकिली क्षेत्रात मोठे यश संपादन करावे, हीच सदिच्छा. सर्व स्तरातून व्यक्त होत आहे त्यांच्या यशाचा प्रवास सतत वृद्धिंगत होत राहो,अशा भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
प्रवरेच्या खोऱ्यातील चणेगावच्या मातीतून घडलेली ॲड.कु.तेजस्विनी विलास दिघे यांनी कला शाखेतून.एल.एल.बी पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन आपल्या कुटुंबासह संपूर्ण चणेगाव गावाचा गौरव वाढविला आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे गावातील तरुणाईला शिक्षणाची नवी प्रेरणा मिळाली असून,विशेषतः मुलींमध्ये आत्मविश्वास आणि उच्च शिक्षणाची जाणीव अधिक दृढ झाली आहे.तेजस्विनी यांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर हे यश संपादन केले आहे.
वकिली हे समाजातील न्याय आणि सत्यासाठी कार्य करणारे महत्त्वाचे क्षेत्र असून, या क्षेत्रात त्यांनी यशस्वी पदार्पण केले आहे.चणेगाव पंचक्रोशीतील प्रथम महिला ॲड.म्हणून त्यांनी एक वेगळा इतिहास रचला आहे.त्यांचे हे यश केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण गावासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.
आजच्या स्पर्धात्मक युगात सातत्यपूर्ण प्रयत्न आणि शिक्षणावरील निष्ठा यामुळे कोणतेही ध्येय गाठता येते,याचे उत्तम उदाहरण तेजस्विनी यांनी समाजासमोर ठेवले आहे.त्यांचे हे कर्तृत्व नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल आणि अनेक विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे बळ देईल यात तीळमात्र शंका नाही.
ॲड.कु तेजस्विनी विलास दिघे यांना उज्ज्वल भविष्यासाठी,कायद्याच्या रक्षणासाठी सदोदित प्रयत्नशील राहण्यासाठी सर्व स्तरातून शुभेच्छा व्यक्त होत आहे.
