अपक्ष गोकुळ गीते विजयी होताच भाजपा आणि शिंदेसेनेने मदत केल्याची दबकी चर्चा

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालात मोठे लागताना दिसले,
सर्व राजकीय अंदाज धुळीस मिळवत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी दणदणीत विजय मिळवत प्रस्थापितांना मोठा धक्का दिला आहे. या विजयामुळे नाशिकच्या राजकारणातील समीकरणे बदलली असून राज्यभरात या निकालाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या शिंदे गटाने अपक्ष गोकुळ  गीते यांना अप्रत्यक्ष मदत केली असल्याची आवाजात चर्चा होताना दिसते.
अपक्ष विजयी उमेदवार गोकुळ गीते या निवडणुकीत एकूण ६१९ मतदारांपैकी ६१८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.त्यापैकी १३ मते अवैध ठरल्याने विजयी कोटा ३०३ निश्चित करण्यात आला. मतमोजणीत गोकुळ गीते यांना तब्बल ३५७ मते मिळाली,तर प्रतिस्पर्धी नरेंद्र दराडे यांना २४८ मतांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे गोकुळ गीते यांनी पहिल्याच फेरीत विजयावर शिक्कामोर्तब केले.

प्रचारादरम्यान विविध राजकीय घडामोडी आणि चर्चामुळे ही निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती.मात्र अंतिम निकालात अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी बाजी मारत सर्व समीकरणे बदलून टाकली.निकाल जाहीर होताच समर्थकांनी जल्लोष करत गुलालाची उधळण केली आणि विजयाचा आनंद साजरा केला.

गोकुळ गीते यांच्या या विजयामुळे नाशिकच्या राजकारणात अपक्ष शक्तीचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षांना नव्याने रणनीती आखावी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!