झरेकाठी सोमनाथ डोळे अकोले-राजूर रस्त्यावरून एक स्कुटीवरून तरुण जात असताना औरंगपूर- आंबड फाट्या दरम्यान अचानक स्फोट झाला.आणि उंच हवेत देखील एक स्फोट झाला.या भयावह स्फोटाने आसपासचे जनजीवन काही काळ विस्कळीत झाले या घटनेत स्कुटीचे दोन तुकडे झाले.तर स्कुटीवरील तरुण ५० फूट हवेत फेकला गेला, तो गंभीर जखमी झाला. असुन त्याला अकोले येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बुधवारी सकाळी हा स्फोट झाला. स्कुटीवरील दिलीप उत्तम ताजणे (वयः ३७) हा तरुण जखमी झाला आहे. ताजणे हा आंबड येथे एका डॉक्टरकडे रोजंदरीतर कामाला आहे त्याचे मळगात शिवनेरी परिसरातील पारुंडे (ता.जुन्नर) असून हल्ली तो आंबड येथे राहात होता. मासेमारीसाठी वापरात येणाऱ्या जिलेटीन कांडीच्या स्फोटात तो जखमी झाल्याचे समजते.
जिलेटीन बंदी असताना अकोलेत ते आले कसे? हा प्रश्न असून पोलिस अधिक तपास करत आहेत. फॉरेन्सिक तपासणी पथक व उपविभागीय पोलिस अधिकारी अकोलेत दाखल झाले आहेत.
दरम्यान सुमारे अठ्ठावीस वर्षापूर्वी अकोले शहरात गुरुवारी आठवडे बाजारात एका मिरच्या विकणाऱ्या राजूर येथील व्यापाऱ्याच्या मांडीखाली जिलेटीन स्फोट झाला होता.व्यापाऱ्याचा पाय तुटून दूर बाजारतळाबाहेर जाऊन पडला होता. त्या स्फोटाने तालुका हादरला होता.त्याची आठवण या घटनेने करून दिली.
