जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एस.आर.दळवी फाउंडेशनची निसर्ग भेट

Cityline Media
0
सीड बॉल निर्मितीद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश

लोणी रुपाली भालेराव जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एस.आर. दळवी फाउंडेशन, राहाता टीचर फोरम अहिल्यानगर यांच्या वतीने निसर्ग भेट व सीड बॉल निर्मिती हा उपक्रम कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी उत्साहात पार पडला.
पर्यावरण संरक्षण व संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई च्या पायथ्याशी निसर्ग भेट देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

हिरवळीचा सहवास, स्वच्छ पर्यावरणाचे महत्त्व आणि निसर्ग संरक्षणाची जाणीव यांचा अनुभव घेत सदस्यांनी पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला या पथकात अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सतीश मुन्तोडे,राहाता तालुका अध्यक्ष राजू बनसोडे, राहाता संघटक राजेंद्र जाधव,विलास शेळके, देविदास गायकवाड,जालिंदर शिंदे,प्रकाश मते,बंडू कोरडे सहभागी झाले होते.

 "निसर्गाशी नाते जपा, पर्यावरण वाचवा आणि भावी पिढ्यांसाठी हिरवेगार भविष्य घडवा.
निसर्गाच्या सान्निध्यात आयोजित कार्यक्रमात सदस्यांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली. यावेळी विविध वृक्षांच्या बियाण्यांपासून सीड बॉल तयार करण्यात आले.आगामी पावसाळ्यात हे सीड बॉल विविध ठिकाणी टाकून वृक्षसंवर्धन करण्याचा संकल्प सदस्यांनी व्यक्त केला.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धन आणि जैवविविधतेचे जतन ही काळाची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संरक्षणासाठी आपली जबाबदारी ओळखून कृतीशील सहभाग नोंदवावा,असे आवाहनही करण्यात आले.
या प्रसंगी फाउंडेशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. "निसर्ग वाचवा भविष्य घडवा" हा संदेश देत पर्यावरण रक्षणासाठी सातत्याने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. निसर्गाची साथ, पर्यावरणाची काळजी घेणे हीच आपली जबाबदारी आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!