आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते सुधाकर रोहम राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

Cityline Media
0
आश्वी प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील दिवंगत मा. आमदार दादासाहेब रोहम यांचे सुपुत्र आंबेडकर चळवळीतील एक अभ्यासू व्यक्तिमत्व सुधाकर प्रभाकर रोहम यांना नुकतेच संगमनेर येथे मालपाणी लॉन्स येथे तेजस प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मालपाणी लॉन्स येथे तेजस प्रतिष्ठानच्या वतीने संविधान दिनाच्या ७५ व्या अमृत महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी तेजस प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव 

बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समावेत महाराष्ट्र राज्यातील ज्या ज्या कुटुंबाने बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे अशा कुटुंबाचा तेजस फाउंडेशन संगमनेर यांनी महाराष्ट्र राज्यांमध्ये सर्वे करून ७५ कुटुंबांचा गौरव करण्यात आला 

यावेळी सुधाकर रोहम हे तत्कालीन मा.आमदार दादासाहेब तथा पी.जे रोहम हे बाबासाहेब आंबेडकरांसमवेत अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यातून एक सच्चा शिलेदार म्हणून कार्यरत होते.

त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना स्वतंत्र मजूर पक्षाची उमेदवारी दिली दादासाहेब रोहम आमदार म्हणून निवडून आले होते त्यावेळी त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना अहमदनगर (अहिल्या नगर) जिल्ह्यामध्ये विशेष आमंत्रण 

देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर अहिल्यानगर जिल्ह्यात २१ दिवस त्यांच्या निवासस्थानी मुक्कामी राहत डॉ आंबेडकरांनी नगर मध्ये थॉट्स अँड पाकिस्तान नावाचा ग्रंथ लिहिला हा इतिहास नाकारता येत नाही.

त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातून राज्यस्तरीय पुरस्काराचे मानकरी सुधाकर प्रभाकर रोहम हे असून वडिलांच्या नंतर अहिल्यानगर मध्ये गेली ५० वर्ष आंबेडकर चळवळीमध्ये कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता निस्वार्थीपणे सुधाकर रोहम.

हे आजतागायत काम करत असल्यामुळे त्यांना हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार तेजस फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.घोसाळे यांनी ‌प्रदान केला आहे यावेळी सर्व पुरस्कारांचे वितरण अकोले तालुक्याचे आमदार डॉ.किरण लाहामटे 

आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकचौरे माणिक यादव तेजस प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ घोसाळे  के.जी भालेराव आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व आंबेडकर चळवळीतील शिलेदारांना व भीमसैनिकांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ॲड संघराज रुपवते होते यावेळी ॲड प्रियंका संगारे, जेष्ठ रिपाइं नेते सुरेश देठे, रिपाइं गवई पक्षाचे उपाध्यक्ष अशोक गायकवाड रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस दादू विष्णू यादव संगमनेर तालुका अध्यक्ष साहेबराव यादव 

सरचिटणीस जालिंदर बोरडे ज्येष्ठ नेते दिलीप यादव रावसाहेब भालेराव स्वातंत्र्यसैनिक गोपीनाथ वाघमारे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष किशोर वाघमारे आदी मान्यवरासह महाराष्ट्र राज्यातून आंबेडकर चळवळीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!