आश्वी प्रतिनिधी संगमनेर शहरातील पद्मानगर येथील रहिवासी असलेले व संगमनेर न्यायालयात गेली अनेक वर्ष विशेष सरकारी वकील म्हणून प्रसिद्ध असणारे ॲड. अरविंद राठोड यांचे नुकतेच वयाच्या ७२ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पक्षात पत्नी मुलगा मुलगी असा परिवार असून ते संगमनेर येथील प्रा. बाबा खरात यांचे मेहुणे होत तर सह्याद्री शिक्षण संस्था जुनिअर कॉलेज संगमनेरच्या प्राध्यापिका श्रीमती राठोड यांचे ते पती होते त्यांच्या निधनाने संगमनेर कोर्टातील वकील संघाने दुःख शोक व्यक्त केला असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
