नाशिक दिनकर गायकवाड नाशिक मध्ये विधान परिषद निवडणूक महायुतीकडून लढवणाऱ्या नरेंद्र दराडेंसाठी दोन संकटमोचक उभे ठाकले असूनही अपक्ष गोकुळ गिते हे माघार घेण्यास तयार नसल्याने ही निवडणूक बिनविरोध होणे अशक्यच असल्याचे सध्याचे चित्र आहे.
नाशिकच्या जागेसाठी भाजपचे नेते गणेश गिते आणि गोकुळे गिते आग्रही होते.महायुतीत ही जागा शिवसेनेला सुटल्यानंतरही गिते बंधुंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.त्यात गणेश गिते यांची समजूत घालण्यात गिरीश महाजन यांना यश आले. गणेश गिते यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. पण गोकुळ गिते ही निवडणूक लढण्यावर ठाम आहेत.
शिवसेना शिंदेगटाकडून नरेंद्र दराडे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत.गोकुळ गिते माघार घेत नसल्याने दराडे यांच्या विजयाच्या मार्गात अडसर आहे. गोकुळ गिते यांनी माघार घ्यावी यासाठी काल मुंबईहून खास उदय सामंत नाशिकला आले होते. गिरीश महाजन सुद्धा नाशिकमध्ये होते. दोन्ही नेत्यांनी बरेच प्रयत्न केले. पण गोकुळ गिते माघार घ्यायला तयार नाही. त्यामुळे गिरीश महाजन आणि उदय सामंत यांना रिकाम्या हाताने परतावे लागले आहे.
गोकुळ गिते अद्यापही निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. काल दिवसभर गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्याकडून गोकुळ गिते यांच्या मन धरणीचा प्रयत्न सुरु होते. मात्र गोकुळ गिते यांनी दोन्ही नेत्यांची भेट टाळली. लवकरच तोडगा काढू असा उदय सामंत यांना विश्वास ते आहे. गिरीश महाजन आज रात्री पुन्हा नाशिक मुक्कामी येणार आहेत. तर उदय सामंत उद्या रात्री नाशिकमध्ये येण्याची शक्यता आहे. गोकुळ गिते यांनी आता नरेंद्र दराडे यांना समर्थन जाहीर करावे, अशी शिवसेनेची मागणी आहे. गिते बंधु हे गिरीश महाजन यांचा शब्द मानतात असे बोलले जाते.
