कोकणगाव मच्छिंद्र पवार संगमनेर तालुक्यातील कोकणगांव शिवापुर येथील निझर्णेश्वर विद्यालयात डिजिटल बोर्ड उद्घाटन सोहळा नुकताच मोठ्या उत्साही आणि आनंदमय वातावरणात पार पडला.
कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत असलेले लघु उद्योग विकास महाराष्ट्रचे शासनाचे व्यवस्थापकीय संचालक भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी विकास पानसरे अधिकारी यांच्या हस्ते या डिजिटल बोर्डचे उद्घाटन करण्यात आले.
हे अत्याधुनिक बोर्ड युथ बिल्ड फाऊंडेशन पुणे यांच्या वतीने निझर्णेश्वर विदयालयास अर्पण करण्यात आले ज्ञान तंत्रज्ञान प्रगतीचा नवा आध्याय विद्यालयात सुरू करण्यात आल्यामुळे विद्यार्थी शिक्षक पालक याच्यात नवचैतन्य निर्माण झाले.
नविन शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसुन येत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निझर्णेश्वर विद्यालयातील सर्व कर्मचारी वृंद तसेच जागृक युवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष घनशाम भोसले यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम आयोजित करून यशस्वी रित्या पार पाडला.
या कार्यक्रमासाठी युथ बिल्ड फाऊंडेशनचे व्यवस्थापकिय संचालक सत्यजित कुलकर्णी संदीप पंडीत स्वप्निल खंडारे यांची उपस्थिती व विशेष मार्गदर्शन लाभले प्रसंगी विकास पानसरे यानी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन कसे यशस्वी होता येते याचा गुरुमंत्र विद्यार्थ्यांना दिला इंग्रजी माध्यमापेक्षा मराठी माध्यमातून देखील आधिकारी होता येते याची जाणीव विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून दिली याचे उदाहरण म्हणुन ते स्वतः कसे वर्ग एकचे अधिकारी कसे बनले याची माहिती दिली.
यावेळी विद्यार्थी शिक्षक व पालक याच्यात एक विश्वास निर्माण केला कोकणगांव येथील एक भूमिपुत्र म्हणुन या विद्यालयासाठी सदैव मदत करीत राहील हा शब्द यावेळी त्यांनी दिला जागृक युवा फाऊंडेशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाठी संस्थेचे अध्यक्ष पालक महिला पालक विद्यार्थी मा.विद्यार्थी तसेच जागृक युवा फाऊंडेशनचे कैलास वायकर बाळासाहेब जोंधळे प्रकाश वायकर हिरामन वायकर मच्छिंद्र पवार कारभारी जोंधळे संपत जोंधळे सोमनाथ जोंधळे आदी उपस्थित होते या कार्यक्रमांसाठी निझर्णेश्वर लाईट्चे मालक परम जोंधळे यांचे विशेष सहकार्य लाभले
