श्रीरामपूर दिपक कदम जय भिम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष नितीन मोरे यांच्या नेतृत्वाखाली जय भीम आर्मीच्या वतीने "मोठ्या संख्येमध्ये उपवर्गीकरण" याला विरोध करण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील तमाम भीमसैनिक २६ जून मुंबईमध्ये जयभिम आर्मीच्या वतीने आयोजित महामोर्चा मध्ये सामील होणार आहे.
या महामोर्चात श्रीरामपूर मधून धर्मांतरीत झालेले अनुसूचित जातीतील समूह मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.त्याच्या तयारीसाठी श्रीरामपूर मध्ये विविध चर्च मधून अनेक पास्टर यांनी जोरदार तयारी करत आहे.
कोणत्याही परिस्थितीमध्ये न्यायमूर्ती बदर समितीचा समितीचा अहवाल रद्द झालाच पाहिजे.या मागणीसाठी आयोजित महामोर्चा मध्ये विशेष करून या जिल्ह्यातील चर्मकार समाजातील मंडळी तसेच संविधानवादी मातंग समाजाची मंडळी मोठ्या प्रमाणे सामील होणार आहेत.
या महामोर्चात जास्तीत जास्त संख्येने सामील व्हावे असे आवाहन महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषद संस्थापक अनिल भोसले जयभिम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सचिन ब्राम्हणे,अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिपक कदम.
भाऊसाहेब तोरणे राजू साळवे संदीप हिवाळे सचिन रूप टक्के निशिकांत पंडित विश्वास अमोलिक अजितकुमार सुडगे संजय तोरणे विजय त्रिभुवन प्रमोद शिंदे प्रवीण राजे शिंदे विलास पठारे सुभाष बोधक सुरेश दुबे चंद्रकांत उजगरे अविनाश काळे राजेंद्र भोसले संजय भोसले यांनी केले
