आशीर्वाद फाउंडेशनच्या वतीने भव्य ख्रिस्ती वधू वर परिचय मेळावा उत्साहात

Cityline Media
0
श्रीरामपूर दिपक कदम नेवासा तालुक्यातील घोडेगाव ख्रिस्त राजा चर्च येथे नुकतेच ख्रिस्ती वधू वर परिचय मेळाव्याचे  आयोजन करण्यात आले होते.
या ख्रिस्ती वधु वर परिचय मेळावास पाथर्डी येथील भक्ती निवास चर्चचे प्रमुख धर्मगुरू रे. फा.संपत भोसले ख्रिस्तराजा तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस,भिमसेना माथाडी व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष दिपक भाऊ साठे,

ख्रिस्तराजा चर्च घोडेगाव येथील प्रमुख धर्मगुरू रे.फा.अब्राहम रणनवरे,रे.फा.आनंद बोधक, सिस्टर नीळमणी, सिस्टर गेल, पत्रकार कमलेश गायकवाड, सहाय्यक अभियंता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अहिल्यानगर येथील किरण गुलाबराव साळवे यांच्या उपस्थितीत ख्रिस्ती वधू वर मेळावा मोठ्या संख्येने पार पडला.

 या मेळाव्याला सर्व पंथीय ख्रिश्चन लग्न करू इच्छिणाऱ्या मुली मुलींसाठी तसेच विधुर, विधवा,आय.टी., इंजिनिअर,डॉक्टर,पदवीधर क्षेत्रातील सर्व एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रसंगी जे वधू वर उपस्थित होते त्यांना आपल्या सोबत फोटो आणि स्वतः उमेदवाराने उपस्थित राहणे अनिवार्य केले होते तरीदेखील पन्नास पेक्षा जास्त वधू वराची नोंद झाली.या मेळाव्यासाठी संभाजीनगर,अहिल्यानगर, नाशिक, पूणे, बीड या जिल्ह्यातील वधू वरानी सहभाग घेतला होता.

या सर्व वधू वर परिचय मेळाव्यासाठी आशिर्वाद फाउंडेशन वधू वर सूचक मंडळाच्या वतीने अध्यक्ष आशिष बनसोडे,सचिव अरविंद लोखंडे,युवा अध्यक्ष आतिष रूपेकर, प्रसिद्धी प्रमुख दिपक कदम,उपाध्यक्ष संजय काळपुंड, 

खजिनदार सॅमसन तोरणे, सचिव कुलदीप कदम, सहसचिव  रविकांत लोखंडे, कार्याध्यक्ष विकास बनसोडे, रमेश साठे, रमेश क्षीरसागर, प्रमोद शिंदे प्रमोद कटारनवरे, प्रभा भालेराव, नवनाथ आरोळे, राजश्री सगळगिळे, धिरज ओहोळ, जिवन बळीद या सर्वांच्या परिश्रमाने हा परिचय मेळावा पार पडला.तसेच किरण साळवे,सुधाकर आढाव, पप्पू आल्हाट,शरद आल्हाट,गुलाबराव साळवे, पिटर बार्गळ, संतोष गाढवे व ख्रिसीराजा चर्च घोडेगाव येथील सर्व युवक ग्रुपचे मोठ्या प्रमाणावर सहकार्य लाभले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!