डिग्रस राजेंद्र पवार राहुरी तालुक्यातील डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा उपस्थित ग्रामस्थांच्या प्रश्नांच्या भडीमाराने चांगलीच गाजली.त्यामुळे पदाधिकार्यानी एकमेकांना सांभाळत ग्रामसभा आटोपती घेतली.डिग्रस ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात नुकतेच विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. गावच्या लोकनियुक सरपंच सौ. रेणूका गावडे सभेच्या अध्यक्ष स्थानी होत्या. सभेसाठी उपसरपंच रावसाहेब पवार, जालिंदर बेल्हेकर, अमोल बेल्हेकर,प्रकाश तारडे,हेमंत मकासरे, काका गावडे, सचिन भिंगारदे, योगेश बेल्हेकर, साहेबराव शेळके,अनिल शिंदे, बाळकृ ष्ण गावडे, राजु बेल्हेकर, संदीप ओहळ, केशव बेल्हेकर, रमेश पारधे उपस्थित होते.
सभेचे इतिवृत जंगम भाऊसाहेब यांनी वाचन केले.सभे पुढील विषय मांडतांना बारागाव नांदूर योजनेसाठी नविन कामाचा प्रस्ताव सादर करणे, शासकीय विभागा बाबत माहिती व आढावा घेणे, प्रधानमंत्री आवास घरकुलाचा आढावा घेणे.
ग्रामपंचायत घरपट्टी व पार्णपट्टी बाबत चर्चा करणे, तंटामुक्ती समिती गठीत बाबत चर्चा करूण अध्यक्ष निवड करणे, शंभर टक्के लशिकरण होणेबाबत चर्चा करणे, १५ व्या वित्त आयोग कामाबाबत चर्चा घडवून आणणे.
प्राप्त तक्रारीये निराकरण करतांना उपस्थित ग्रामस्थांनी प्रश्नांचा भडीमार सुर केल्याने त्यांच्या तक्रारीये निवारण करतांना पदाधिका यांची दमछाक झाली. आरोग्य विषयी डॉ. कवडे. यांना उपस्थित ग्रामस्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत अनेक प्रश्न उपस्थित केल्या ने नागरीकांना समाधानकारक उत्तरे त्यांना देता न आल्याने त्यांना ग्रामस्थांनी गप्प बसण्याचा सल्ला दिला.
त्यामुळे ग्रामस्यांच्या जिवणाशी निगडीत असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत माहिती न मिळाल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.गावातील गरजु लाभार्थ्यांना पुर्वी जुने घरकुल मिळाली ती आता कोणाच्या नावावर आहेत.
ते लाभार्थी तेथे वास्तव्यास आहेत का? अशी एक ना अनेक प्रश्न विचार त धारेवर धरले.ग्रामसभेत रामवाडी, शोलेवाडी, भिमनगर, कोयबामाळ, येथील महिला व ग्रामस्यांच्या अनेक तक्रारी समोर येत राहील्याने यात मार्ग न काढता आल्याने उपस्थित ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासना विषयी नाराजी व्यक्त केली.
अंतिमतः तंटामुक्ती समिती गठीत करुन अध्यक्ष निवडी बाबती सविस्तर चर्चा करण्यात आली. गेली अनेक वर्षापासून गावाला तंटामुक्तीचा अध्यक्ष मिळत नसल्याने हे पद रिक्त झालेले आहे. त्यासाठी या विशेष ग्रामसभेचे आयोजन केले गेले होते.
तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष परासाठी १२ इच्छुकांनी आपापली नावे दाखल केली नावे दाखल झाल्यानंतर तंटामुक्ती समितीचा अध्यक्ष कला असावा याचीही चर्चा झाली अनेकांनी अनेकांची मर्जी राखण्यासाठी नावाच्या सुचना मांडत आमक्याला अध्यक्ष करा तमक्याला अध्यक्ष करा असा जोर लावला मात्र काहीही उपयोग झाला नाही. ग्रामसभेच्या शेवटी अखेर उपस्थित ग्रामस्त व महिला ग्रामस्थांनी अध्यक्ष पदासाठी १५ ऑगष्ट रोजी मतदान घेवून तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाची निवड करावी असा आग्रह धरल्याने ग्रामसभा अटोपती घेण्यात आली. विशेष म्हणजे आज पर्यंतच्या ग्राम पंचायत मध्ये झालेल्या ग्रामसभेसाठी कधीच कोरम पुर्ण झाला नव्हता एवढी मोठी गर्दी या ग्रामसभेला ग्रापस्थांनी केल्याने हा चर्चेचा विषय ठरला.
