जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खरशिंदेत १७ नवागतांचे स्वागत

Cityline Media
0
खरशिंदे भैय्या इनामदार संगमनेर तालुक्यातील खरशिंदे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १७ नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.त्यांचा शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या १७ नवागत विद्यार्थ्यांची व खरशिंदे शाळेतील शैक्षणिक प्रगती पाहून बाहेरील शाळेतून इयत्ता दुसरी,तिसरी ,चौथी व पाचवी या वर्गामध्येही नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ग्रामस्थ, पालक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ही मिरवणूक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

यानंतर शाळेच्या प्रवेशद्वारावर नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, स्वागत टोपी व खाऊ वाटप करून जंगी स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने पहिले पाऊल उपक्रमांतर्गत भाषिक विकास,सामाजिक विकास,भावनिक विकास तसेच गणनपूर्व तयारी याबाबत विविध शैक्षणिक साहित्य व वस्तूंच्या माध्यमातून ओळख करून देण्यात आली.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. त्यामुळे नवागत विद्यार्थी व पालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

या कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शाहरुख शेख, उपाध्यक्षा सौ. माधुरी वाडेकर, सामाजिक कार्यकर्ते  भैय्यासाहेब इनामदार तसेच पालक  अजीज शेख, अरबाज शेख, जब्बार शेख, रावसाहेब कोळसे, सतिश वाडेकर, सखाराम भुसारी, सत्यजित वाडेकर, प्रशांत वाडेकर.पोपट वाडेकर,नाना वाडेकर राहुल पंडित,गणेश भुसारी यांच्यासह ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक विजय गागरे,वर्गशिक्षक मनोहर यादव तसेच बाळू गावडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!